पोस्ट्स

मकर संक्रातीच्या निमित्याने ! (भाग 1)

इमेज
     14 जानेवारी रोजी मकर संक्रांत हा सण आहे. सुर्याचे उत्तरायण आणि  मकर राशीत भासमान भ्रमण सुरु होण्याचा निमित्ताने हा सण साजरा करण्यात येतो. सुमारे हजार वर्षांपूर्वी सुर्याचा मकर राशीत प्रवेश होताना  उत्तरायण सुरु होत असे. मात्र पृथ्वीचा परांचन गतीमुळे यात फरक पडला आहे. सध्या 22 डिसेंबर रोजी उत्तरायणास सुरवात होते.  तर दर 70 वर्षांनी मकर संक्रातीचा एक दिवस पुढे जातो. स्वामी विवेकानंद यांच्या जन्माचा वेळी 12 जानेवारीला मकर संक्रांत हा सण येत असे, आता हा सण 14 किंवा 15 जानेवारीला येतो. हा फरक का पडतो?  हे सांगण्यासाठी आजचे लेखन .सुर्य अथवा इतर ग्रह एखाद्या राशीत जातो, म्हणजे काय ?(माझी माहिती खगोलशास्त्राच्या दृष्टीने असेल,ज्योतिषशास्त्रानुसार नसेल याची नोंद घ्यावी) माहिती मी याच लेखाच्या पुढील भागात देईल. तर  बघूया मकर संक्रांती आणि उत्तररायण यांचा सबंध उलगडणारी माहिती.         मित्रांनो, पृथ्वी स्वतःभोवती फिरते, त्यास परीभ्रमण म्हणतात ,तर सुर्याभोवती फिरते, त्यास परीवलन म्हणतात. हे आपणास माहिती असेलच. याशिवाय पृथ्वीला अजून ए...

योद्धा संन्यासी

इमेज
म रगळलेल्या समाजाचा देश जो  स्वतःचे सत्व विसरलेला होता ,त्या देशाला गतवैभवाची आठवण करून देऊन स्वतःत आत्मविश्वास भरणारा , त्याला फिनिक्ष पक्षाप्रमाणे उभारी देणारा , जगातील अन्य देशांना स्वतःच्या देशाविषयी मनातील प्रतिमेत  नकारात्मक प्रतिमेपासून सकारात्मक बदलण्यास भाग पडणारा संन्यासी म्हणजे  स्वामी विवेकानंद , आणि त्यांचा देश म्हणजे आपला भारत देश .  १२ जानेवारी ही त्यांची जन्मतारीख . त्याबद्दल त्यांना विन्रम आदरांजली . त्यांची जयंती भारतात राष्ट्रीय युवक दिन म्हणून साजरा केली जाते .         स्वामीजींनी निव्वळ जगाला भारताविषयीची साप  गारुड्यांच्या देश ही प्रतिमा बदलून थोर ज्ञानाचा देश अशरायलाच लावली असे नव्हे तर , भारतातील गोरगरिबांची सेवा देखील केली . रामकृष्ण मठ आणि रामकृष्ण मिशन ही त्याचीच प्रतीके . मी स्वतः रामकृष्ण मठातील युवक वर्गाचा फायदा घेतला आहे . खूप प्रेरणादायी अनुभव प्रत्येकवेळेस मला आला आहे  स्वामी विवेकानंदानी पाशात्य देशात भारतीय अध्यात्माची ओळख करून दिली याची सुरवात झाली . ती सर्वधर्म परिषदेत त्यांनी केलेल्या...

साहित्य संमेलन आणि मी !

इमेज
      मराठी भाषा मातृभाषा असणाऱ्या आणि साहित्यावर विशेष परीणाम असणाऱ्या लोकांसाठी विशेष महत्तवाचे असणाऱ्या अखिल भारतीय साहित्य संमेलनाचे94 वे साहित्य संमेलन नाशिकला होण्याचे निश्चित झाले आहे. मार्च 2021मध्ये  जेव्हा  जंगलात वसंत ऋतूमुळे विविध फुले फुलली असतील तेव्हा नाशिकच्या  साहित्य पंढरीत 94 व्या साहित्य संमेलनामुळे मराठी  साहित्याला नवीन धूमारे फुटत असतील.          या साहित्य संमेलनात मराठी साहित्याचा आणि मराठी भाषेच्या विविध समस्येवर चर्चा  आयोजित केल्या जातात. जसे मराठी माध्यमांचा शाळा, वाचनालयाची स्थिती, मराठी भाषेवरील इतर भाषांचे आक्रमण वगैरे , हे आपणास  माहिती असेलच. मात्र या विविध विषयांवर होणाऱ्या चर्चेच्या दरम्यान एका महत्तवाच्या विषयावर फारसे विचारमंथन होताना आपणास दिसत नाही, तो विषय म्हणजे विज्ञान कथांचे मराठी साहित्यविश्वातील स्थान .            डाँ. जयंत नारळीकर यांनी मराठीत नावारुपाला आणलेल्या या साहित्यप्रकारात डाँ. श्रीनिवास आपटे यांनी देखील विपूल लेखन केले. मात्र ड...

वंदन विश्वनिर्मितीचे कोडे उलगडणाऱ्याला

इमेज
आपण निरभ्र आकाशात, प्रकाश्याचे प्रदुषण नसताना (लाईट पोल्युशन) आकाशात  नजर टाकली असता , विविध दिर्घीका, तारे, ग्रह, उपग्रह , बटूग्रह , लघूग्रह  दिसतात , आणि आपणास प्रश्न पडतो, या सर्वांची निर्मिती कशी काय झाली असेल? या अथांग विश्वाचे भविष्य काय असेल? असाच प्रश्न आजपासून सुमारे 60 वर्षापुर्वी अमेरीकेच्या एका तरुणाला पडला, त्याने याबाबत सातत्याने संशोधन केले. दुर्दैवाने तो 21 वर्षाचा असताना त्यास दुर्धर असा विकार जडला , ज्यामध्ये त्याची हाताची काही बोटे आणि मेंदू  सोडून सर्व अवयव निकामी झाले, मात्र त्यामुळे खच्चून न जाता त्याने विश्वनिर्मितीचे कोडे उलगडणारे एक पुस्तक लिहले, जे अमेरीकेतील सर्वाधिक काळ बेस्ट सेलर ठरणारे पुस्तक ठरले. न्युटनच्या जन्मानंतर 400 वर्षानी जन्मलेल्या आइन्सटाईनचा वारसा पुढे नेणाऱ्या त्या तरुणाचे  नाव आहे, स्टिफन हाँन्किस हॉकिंग्स  . ज्येष्ठ खगोल शास्त्रज्ञ असणाऱ्या स्टिफन   हॉकिंग्स यांचा 9 जानेवारी हा वाढदिवस, त्याबद्दल त्यांना विनम्र आदरांजली.  स्टिफन्स हॉकिंग्स यांनी लिहलेल्या त्या पुस्तकाचे नाव आहे "ए ब्रिफ हिस्टरी आँफ टाईम...

हिवसाळ्याचा निमित्ताने

इमेज
आज गुरुवार  दिनांक 2021 जानेवारी 7 रोजी नाशिकमध्ये भर दुपारी सुमारे दिडतास मुसळाधार पाउस झाला. याआधी डिसेंबर 2020 मध्ये पाउस पडला होता,त्यामुळे "नाशकात हिवसाळा हा ऋतू सुरु झाला आहे' , 'स्वेटर घालावा की रेनकोट असा प्रश्न नाशकातील हवामानामुळे निर्माण झाला आहे, अश्या आशयाचे मेसेज सोशल मिडियामध्ये  वेगाने फिरु लागले.  विनोदासाठी या प्रकारचे मेसेज उत्तम असले तरी पर्यावरणाचा प्रश्न किती गंभीर बनला आहे. याची  साक्षच हा पाउस देत आहे.              हवामानबदलामुळे 2020साली सर्वाधिक हानी पोहलेल्या देशांमध्ये भारताचा क्रमांक पहिला आहे, अशा अहवाल नुकताच सयुंक्त राष्ट्रसंघातर्फे प्रसिद्ध करण्यात आला आहे, त्या पार्श्वभूमीवर बघीतल्यास या पावसाचे गांभीर्य लक्षात येते.पाश्चात्य देशातील निवडणूकांमध्ये राजकीय पक्षांच्या जाहिरनाम्यात हवामान बदल हा विषय असतोच, आपल्याकडे काय विषय असतात? हे आपण जाणतातच.नाही म्हणायला शालेय आणि महाविद्यलयीन स्तरावर आपणाकडे पर्यावरण हा विषय शिकायला असतो, मात्र त्याचे अपेक्षीत परीणाम साध्य होतात का ? हे ही आपणास माहिती आहेच. का...

समर्थकांसाठी समर्थकांकरवी..समर्थकांचा राडा

इमेज
                         लोकशाही म्हणजे लोकांसाठी, (for the by people)लोकांकरवी , (by the people) लोकांच्या मार्फत  (of the people) चालवण्यात येणारी शासनव्यवस्था  होय, अशी लोकशाहीची व्याख्या अमेरीकेचे प्रसिद्ध अध्यक्ष अब्राहम लिंकन यांनी केली होती. मात्र लवकरच ही व्याख्या आपलेच वारसदार समर्थकांसाठी, समर्थकांकरवी, समर्थकांच्या मार्फत चालवण्यात येणारी शासनव्यवस्था असी बदलतील, अशी त्यांना कल्पना नसेल.अब्राहम लिंकन यांना अनपेक्षीत असणारी ही घटना अमेरीकेत 2021  जानेवारी 6 रोजी घडली, ज्यात हे लेखन करेपर्यत 4 निष्पापांना आपल्या प्राणास मुकावे लागले आहे. आधूनिक जगाचा विचार करता, पहिल्या काही लोकशाही असणाऱ्या अमेरीका या  देशात ही लोकशाहीची हत्या करण्याची घटना घडली आहे.           निवडीच्या प्रक्रीयेतील काही तरतूदींच्या आधारे, जनाधार असणाऱ्या विरोधी पक्षाच्या उमेदवार हिलरी क्लिंटन यांना पराभूत करून, सत्तेच्या सर्वोच्च स्थानी असणाऱ्या पोहोचणाऱ्या,  डोनाल्ड ट्रम्प यांनी आता कोलांटी...

भारतीय रेल्वे..... वेगाने बदलाच्या वाटेवर

इमेज
       भारतीय रेल्वे, सध्याचा काळातील केंद्र सरकारचा सर्वात जास्त वेगाने बदलत जाणारा उपक्रम. दर आठवड्यात किमान तरी बातमी ही भारतीय रेल्वेतील बदलांविषयी असतेच. काही बदल तात्कालीक असतात, तर काही दुरगामी परीणाम करणारे असतात. या बदलांच्या मालिकेत गेल्या आठवड्यात 3 बदलांची भर पडली, त्याविषयी सांगण्यासाठी  आजचे लेखन.      तर मित्रांनो, रेल्वेच्या गाड्यांबरोबर प्रवास करणाऱ्या स्टाफविषयी अर्थात रनिंग स्टाफ(ज्यामध्ये रेल्वे इंजिनाचे चालक, रेल्वे गार्ड , डब्यात तिकीट तपासणारे, पेंट्री कारचे कर्मचारी, काही संवेदनशील भागात रेल्वेमध्ये सुरक्षा देणारे सुरक्षा दले यांचा समावेश होतो). विषयी मोठे परीणाम करणारे दोन बदल रेल्वेमध्ये गेल्या आठवड्यात जाहिर करण्यात आले तर एक  प्रवाश्यांसदर्भात एक बदल झाला. तर मित्रांनो, आता पर्यत रेल्वे इंजिनात शौचालयाची सोय नव्हती, त्यामुळे रेल्वे इंजिन चालकांची मोठी कुचंबना होत असे.  यावर आता तोडगा काढण्यात आला आहे. भारतीय रेल्वे इंजिनाची निर्मिती करणाऱ्या डीझेल लोकोमोटिव्हि वर्क्स वाराणसी (जो डि एल डब्ल्यु वाराणसी या नावान...