पोस्ट्स

मालदीवमधील भारतविरोधी सूर

इमेज
            मालदीव भारताच्या पश्चिमेला असणारे सुन्नी इस्लाम हा प्रमुख धर्म असणारे १ हजार बेटावर वसलेले राष्ट्र. आशिया खंडातील क्षेत्रफळाने अत्यंत कमी असणाऱ्या देशांच्या यादीत क्रमांक २ वर असणारे  (पहिल्या क्रमांकावर कतार तर तिसऱ्या क्रमांकावर सिंगापूर) अरबी समुद्रात वसलेले राष्ट्र . जागतिक हवामान बदलामुळे सर्वाधिक प्रभावित होणाऱ्या राष्ट्रांपैकी एक म्हणजे मालदीव . . बांगलादेशच्या पुढाकाराने स्थापन झालेल्या सार्क या संघटनेतील भारताचा सहकारी म्हणजे मालदीव श्रीलंकेने आक्रमण केल्यावर ज्या देशाला भारतीय नौदलाने स्वतंत्र केले तो म्हणजे मालदीव  तर अश्या मालदीवमध्ये २०१३ ते २०१८ या काळात देशाच्या अध्यक्षस्थानी राहिलेल्या अब्दुला यामिन यांच्या नेतृत्वात भारतविरोधी आंदोलन सुरु आहे त्यांचे समर्थक मालदीवमध्ये  ठिकठिकाणी  घेऊन शर्टावर Get Out India असे लिहून Get Out India असे फलक घेऊन मालदीवमध्ये उभे आहेत.  मालदीवचे माजी राष्ट्राध्यक्ष  हे त्यांच्या भारतविरोधी आणि चीन समर्थक भूमिकेसाठी ओळखले जातात मात्र मालदीवचे सध्याचे राष्ट्राध्यक्ष...

उरल्या फक्त आठवणी... त्या काळरात्रीच्या

इमेज
  ख्रिसमसची सुट्टी आनंदीत घालवण्यासाठी ते समुद्रकिनारी आले होते. मात्र हा दिवस आपल्या आयुष्यातील शेवटचा दिवस असणार आहे, याची त्यांना पुसटशी देखील कल्पना नव्हती. हवामान खात्यातर्फे  कोणत्याही वादळाची पुर्वसुचना देण्यात न आल्याने ते आनंदाने समुद्राचा लाटांशी खेळत होते. मात्र याच समुद्राचा लाटा आपल्या प्राणांचे हरण करणार आहेत, याबाबत त्यांना  काहीच माहिती नव्हती. जपानमध्ये या प्रकारचे संकट नवीन नसले तरी , ते ज्या प्रदेशात समुद्रात मज्जा करत होते, त्या प्रदेशात या प्रकारचे संकट आल्याचा कोणताही ज्ञात इतिहास नव्हता. त्यामुळे ते बिनधास्त समुद्राच्या लाटांशी खेळत होते. ते ज्या ठिकाणी होते. तिथे नुकतेच उजाडले होते. त्यामुळे सर्व जण निवांतपणे समुद्रकिनारी फिरत होते. मात्र नियतीला ते मान्य नव्हते. हे त्या संकटावरुन दिसून येत आहे .       कारण कोणाच्या ध्यानीमनी नसताना जागतिक प्रमाणवेळेनूसार रात्री 12 वाजून 58 (जिथे ही घटना घडली त्या ठिकाणच्या स्थानिक वेळेनुसार सकाळी 7 वाजून 58 मिनीटे { भारतीय प्रमाणवेळेनुसार सकाळी 6 वाजून 28 मिनीटे}) मलेशियाचा उत्तर बेटाच्या पश्चिमेला ...

22 वर्षे विमान अपहरणाची

इमेज
           प्रत्येक माणसाच्या आणि देशाच्या वाटचालीत काही कटू दुःखद प्रसंग येतच असतात . आपल्या भारताच्या वाटचालीत सुद्धा आजपासून एकवीस वर्षांपूर्वी असाच  कटू प्रसंग आला होता , तो होता इंडियन एअरलाईन्स या कंपनीच्या आयसी 814 या काठमांडू ते दिल्ली येथे जाणाऱ्या विमानाचे लष्कर ए तैयबा या दहशतवादी संघटनेच्या अतिरेक्यांनी केलेले अपहरण हा होय . . यामध्ये रुपेण कटियाल या प्रवासाचा बळी गेला आणि आपण आपल्या तुरुंगात असलेल्या हाफिज सय्यद या दहशतवाद्याला सोडून दिले . याच हाफिज सय्यद याने पुढे भारतीय संसदेवर हल्ल्याची योजना आखली . सुदैवाने त्या  नंतर आपल्या एकाही विमानाचे अपहरण झालेले नाही . त्या वेळेस केंद्रात माननीय अटलबिहारी यांचे सरकार होते . काठमांडू  येथून 24 डिसेंबर1999 ला दुपारी सव्वातीनच्या सुमारास दिल्लीसाठी उड्डाण भरलेल्या या विमानाचे अपहरण करण्यात आले होते . यातील प्रवाशी सात दिवसांनी दिल्लीत परतले . आपण बाजूच्या नकाश्यात याचा मार्ग बघू शकतात . यातील काळ्या ठिपक्याच्या स्वरूपात जो मार्ग दिसत आहे तो आहे विमानाच्या मूळ मार्ग तर लाल रेषेत...

महारष्ट्रातील रेल्वे बदलतीये .....

इमेज
          सध्या भारतातील रेल्वे झपाट्याने कात टाकत आहे . त्याचाच परिणामस्वरूप महारष्ट्रातील रेल्वेसुद्धा विद्युतवेगाने बदलत आहे रेल्वे संदर्भात विविध प्रलंबित प्रकल्प झपाट्याने पूर्णत्वाकडे जात आहे यासाठी रेल्वेत प्रशासनिक बदल तसेच पायाभूत सोयीसुविधा उभारणे याचा समावेश होत आहे गेल्या पंधरवड्यात अहमदनगर - परळी रेल्वेमार्ग , कुर्डुवाडी लातुर रेल्वेमार्ग या मार्गाबाबत अनेक चाचण्या घेण्यात आल्या तसेच अंकाई औरंगाबाबाद , मनमाड औरंगाबाद आणि औरंगाबाद परभणी या रेल्वेमार्गाबाबत विविध प्रस्तावास मंजुरी तसेच मध्य रेल्वेचा सोलापूर विभागातील सुमारे २५० किमीचा मार्ग मध्य रेल्वेचा पुणे विभागांतर्गत वर्ग करण्याबाबतचा हालचालीस वेग देणे आदी घडामोडी महाराष्ट्राचा रेल्वेबाबत घडल्या .      आजपासून सुमारे  २५ वर्षांपूर्वी अर्थात १९९५-९६सालच्या रेल्वेअर्थसंकल्पात मंजूर करण्यात आलेल्या मात्र निधीची अपुरी  तरतूद आणि इतर काही  बाबींमुळे फारसे काम न झालेल्या या सुमारे २८५ किमीच्या मार्गाचे काम सध्या वेगाने सुरु आहे या मार्गावरील अहमदनगर ते आष्टी या ६४ किमी मा...

संसदेचे हिवाळी अधिवेशन २०२१

इमेज
         नुकतेच संसदेचे हिवाळी अधिवेशन झाले .  ब्रिटिश भारतात  लागू करण्यात आलेल्या १९३५ च्या भारतीय प्रशासन कायद्यानुसार अमलात आलेली तरतूद जी भारतीय संविधानाच्या ८५ व्य कलमात अंर्तभूत  आहे,  या तरतुदीनुसार एका वर्षात किमान दोन संसद अधिवेशने होणे अत्यावश्यक आहे तसेच प्रत्येक अधिवेशनामध्ये ६ महिन्यापेक्षा अधिक कालावधी असू नये अशी तरतूद आहे मूळ १९३५ च्या कायद्यामध्ये संसदेचे प्रत्येक वर्षी एक अधिवेशन घेणे अत्यावश्यक होते पुढे भारत स्वतंत्र झाल्यावर तयार करण्यात आलेल्या संविधानानुसार एका वर्षात किमान २  अधिवेशने घेणे आवश्यक आहे संविधानातील तरतूद २ अधिवेशनाची असली तरी  प्रत्यक्षात ३ अधिवेशने होतात फेब्रुवारीत होणाऱ्या अधिवेशनाला अर्थसंकल्पीय अधीवेशन म्हणतात तर पाऊस पडण्याच्या काळात होणाऱ्या अधिवेशनाला मानसुम  अधिवेशन म्हणतात तर हिवाळ्याच्या काळात होणाऱ्या अधिवेशनाला हिवाळी अधिवेशन म्हणतात  . त्यानुसार हे अधिवेशन झाले हे अधिवेशन मुळात २४ दिवस होणार होते जे संसदेत होणाऱ्या गोंधळाचे कारण देत सरकारकून एक द...

लडाख वासियांच्या आक्रोश

इमेज
            लडाख ,भारताचं नवनिर्मित सर्वात तरुण अश्या दोन केंद्रशासित प्रदेशांपैकी पैकी एक .ज्याची निर्मिती जम्मू काश्मीर या राज्याचे  पुर्नघटन झाल्यावर त्यावेळच्या जम्मू आणि काश्मीर राज्यातून झाली . चीनच्या सिंकीयांग या (याला काही ठिकाणी झिंकियांग असा उल्लेख केलेला आढळतो ) मुस्लिम बांधवांची संख्या अधिक असणाऱ्या  स्वायत्त प्रांताशेजारील हा प्रदेश त्याच्या दुर्गमतेमुळे आणि चीनविषयक कारवायांमुळे सातत्याने चर्चेत असतो १९६२ साली याच भागाचा एका लचका तोडून चीनने त्यांच्या सिकियांग प्रांतात  अनधिकृतपणे समाविष्ट केला  तर अशा लडाख गेल्या काही दिवसापासून पुन्हा एकदा चर्चेत आला आहे त्याला कारण आहे तेथील एकमेव असणाऱ्या खासदाराने लोकसभेत केलेली मागणी  तर मित्रानो १३ डिसेंबर रोजी  जमयांग सेरिंग नामग्याल यांनी संसदेत काही मागण्या केल्या ज्यामध्ये संसदेतील लडाखचे  प्रतिनिधित्व वाढवणे ,लडाखला स्वतंत्र विधिमंडळाची स्थापना करणे तसेच संविधानाच्या ६ व्या परिशिष्टात लडाखच्या समावेश करणे या प्रमुख मागण्या आहेत हा मजकूर लिहीत असताना लडा...

ग्यानामिड एक अजब उपग्रह

इमेज
       सतराव्या शतकाच्या प्रारंभीच्या दशकात जेव्हा दुर्बिणीचा नुकतंच अवकाश संशोधनासाठी वापर होऊ लागला होता त्यावेळेस महान खगोलशास्त्रज्ञ ग्यलिलिओ यांनी  गुरूच्या चार उपग्रहांच्या शोध लावला.  ज्यास ग्यलिलिओचे उपग्रह असे म्हणतात आयो युरोपा ग्यानामिड कॅलीस्ट्रो हे ते चार उपग्रह . यातील ग्यानामिड या उपग्रहाबाबत २ मोठ्या  आश्चर्यकारक माहित्या समोर आल्या आहेत नासाच्या जुनो या मोहिमेद्वारे या  माहित्या  समोर आल्या  आहेत       ग्यानामिड हा उपग्रह सौरमालिकेतील सर्वात मोठा उपग्रह आहे जो बुध ग्रहांपेक्षा मोठा आहे . ग्यानामिड हा उपग्रह सौरमालिकेतील ज्यांच्या पृष्ठभागाखाली मोठा महासागर असावा अशी खगोल शास्त्रज्ञांना शक्यता वाटते अश्या पाच उपग्रंहापैकी एक आहे उरलेल्या चार पैकी युरोपा आणि कॅलीस्ट्रो हे गुरुचे तर टायटन आणि एन्सेलाडस हे शनीचे उपग्रह आहेत ग्यानामिड  या उपग्रहावर या उपग्रहाचा व्यास ५३०० किमी आहे पृथीच्या महासागरमध्ये असणाऱ्या पाण्यापेक्षा २५ पॅट पाणी या उपग्रहावर असावे असा शास्त्रज्ञांचा अंदाज आह...