पोस्ट्स

पाकिस्तानातील लोकशाही

इमेज
          ९  एप्रिलच्या रात्री आणि १० एप्रिल च्या पहाटे आपल्या लोकसभा सदृश्य पाकिस्तानच्या सभागृहात अनेक नाट्यमय घडामोडी घडल्या ज्याची अंतिम परिणीती पाकिस्तानच्या पंतप्रधानपदावरून इम्रान खान यांची गच्छन्ति होण्यात झाली . ज्यामुळे पाकिस्तानच्या कोणत्याही पंतप्रधानांनी त्यांच्या कार्यकाळ पूर्ण न करण्याची परंपरा अबाधित राहिली . मुळात आमरण खान यांचीपदावरून गच्छन्ति होणार हे या आधीच स्पष्ट झाले होते मात्र बुडणाऱ्या जहाजाचा कप्तान जसे शेवटपर्यंत आपली जागा सोडत नाही बुडणारे जहाज वाचवण्याचा निकराने प्रयत्न करतो त्या प्रमाणे विविध व्यक्तींकडून इम्रान खान यांना पदाचा राजीनामा देत सम्मानाने पायउतार होण्याचा सल्ला मिळत असताना देखील इम्रान खान यांनी अखेरपर्यंत सत्ता ताब्यात ठेवण्याचा प्रयत्न केला इम्रान खान यांच्या या प्रयत्नांमागे पाकिस्तानच्या मागच्या पंतप्रधानाची पायउतार  गच्छन्ति झाल्यावर होणाऱ्या  परिस्थितीची देखील पार्श्वभूमी होती हे नाकारून चालणार नाही त्या पंतप्रधानाची झाली तशी दुर्दशा आपली होऊ नये यासाठी त्...

श्रीलंकन गुंत्यांची साखळी

इमेज
             आपल्या दक्षिणकडील डोळ्यातील अश्रूच्या आकारातील देश अर्थात श्रीलंका या देशातील नागरिकांच्या डोळ्यातून  खरोखर अश्रू येण्यासारखी त्यांची स्थिती झाली आहे हे एव्हाना आपणास माहिती असेलच . यामागची अनेक कारणे आपणास व्हाट्सअप वगैरे समाजमाध्यमातून  आपणस स्वतंत्ररित्या माहिती देखील असतील जसे श्रीलंकन सरकारने तेथील नागरिकांना दिलेल्या अनेक कर सोयीसवलती , चीनचा कर्जाचा डोंगर, त्यांची परदेशी गंगाजळी  आटणे वैगरे.  मात्र यापैकी  . कोणत्याही एकाच कारणांमुळे त्यांची अशी स्थिती झालेली नाही . तर या सर्व कारणांचा एकत्रित परिणाम स्वरूप म्हणजे श्रीलंकेवर आलेले संकट हा एकत्रित परिणाम कशा आहे हे आता बघूया         पहिल्यांदा कर्जाचा विचार करूया कोणत्याही देशाने कर्ज घेणे यात काहीहीही वावगे नाही अमेरिकेचाच विचार करता अमेरिकेवर जगातील कित्येक देशांच्या एकत्रित कर्जापेक्षा अधिक कर्ज आहे . आपल्या भारतावर देखील मोठ्या प्रमाणात कर्ज आहे कर्ज घेणे यात काह्ही वाईट नाही किंबहुना कर्ज घेतल्यामुळेच जागतिक अर्थव्यवस्था टिक...

या मुद्यांवर आपण मौन कधी सोडणार ?

इमेज
   सध्या आपल्या महाराष्ट्रात विविध राजकीय घडामोडीना वेग आला आहे . राजकीय नेते एकमेंकांवर  आरोप प्रत्यारोप करत आहे . विविध केंद्रीय तपास  यंत्रणांच्या गैरवापर केल्याच्या आरोप सत्ताधिकाऱ्याकडून विरोधकांवर केला जात आहे विरोधी पक्षांच्या नेत्यांकडून सत्ताधिकारी पक्षाच्या विविध नेत्यांवर भष्टाचाराचे  अनेक आरोप करण्यात येत आहे या आरोप प्रत्यारोपाच्या गदारोळात एका  महत्त्वाच्या प्रशांबाबत मात्र अनेकांकडून मौन बाळगले जात आहे . तो म्हणजे सध्याची कृषी  क्षेत्राची स्थिती  महाराष्ट्राच्या सन २०२१ -२२ च्या आर्थिक पाहणी अहवालात  तृणधान्ये तकडधान्ये तेलबिया कापूस यांचे एकरी उत्पादन मोठ्या प्रमाणा  घटल्यामुमुळे चिंता व्यक्त करण्यात आली होती कांद्याचे एकरी उत्पादन घटल्याचे एका पाहणी अहवालातून स्पष्ट झाले आहेच आर्थिक पाहणी अहवालात सांगितल्याप्रमाणे तृणधान्ये तकडधान्ये तेलबिया कापूस प्रमाण जरी लक्षणीय रित्या कमी झाले असले तरी यासारखी अनेक पिके या रांगेत आहेत मी कांदा खात नाही कांदा काही जीवनवश्यक गोष्ट नाही अशी भूमिका आपण कांद...

पद्धत आपली पद्धत त्यांची

इमेज
              आपल्या जगभरात विविध प्रकारच्या शासनव्यस्था अढळतात काही मोजक्या देशांचा अपवाद वगळता त्यासर्व लोकशाहीचीच विविध रूपे आहेत . काही ठिकाणी  अध्यक्षीय लोकशाही आहे तर भारतासारख्या काही देशांत संसदीय लोकशाही आहे या सर्व लोकशाहीप्रधान शासनव्यस्था असणाऱ्या देशात शासन प्रमुख ठरवण्यासाठी निवडणूका होतात . या निवडुणकांमधून शासन प्रमुख निवडण्याच्या पद्धतीत देखील अनेक फरक आहेत अमेरिका सारख्या देशात राष्ट्राध्यक्ष निवडण्यासाठी होणाऱ्या निवडणुकीत उमेदवाराला स्वतःच्या पक्षाचे अधिकाधिक  इलेक्टोर जिंकावे लागतात  ज्या पक्षाचे सर्वाधिक इलेक्टोर  जास्त जिकतात  त्या पक्षाचा उमेदवार अमेरिकेचा राष्ट्र्याध्यक्ष होतो    त्यातही एका विशिष्ट राज्यतील   सर्वात जास्त  इलेक्टोर जिंकल्यास त्या पक्षाने सर्व  इलेक्टोर जिंकले असे समजले जाते उदाहरणार्थ एक राज्यता ३५  इलेक्टोर आहेत त्यातील १८  इलेक्टोर एक पक्षाने जिंकले अमी १७ त्याच्या विरोधी पक्षाने ...

अखेर शिकामोर्तब

इमेज
          गेली पाच महिने सुरु असलेल्या, एसटी कर्मचाऱ्यांचा संपाबाबत अखेर उच्च न्यायालयाचा निकाल आला. न्यायालयाने विलीनीकरणाबाबत निर्णय घेण्याचे, पुर्ण अधिकार राज्य सरकारला असल्याचे, सांगत विलीनीकरण करण्याची कर्मचाऱ्यांची मागणी फेटाळली. तसेच 15एप्रिलपर्यत कर्मचाऱ्यांना कामावर हजर राहण्याचे निर्देश दिले. एसटी कर्मचाऱ्यांवर अन्याय करावा,असी न्यायालयाची भुमिका कधीच नव्हती.असेही आपल्या निरीक्षण न्यायालयाने आपल्या निकालपत्रात नोंदवले           एसटी प्रशासनाने कर्मचाऱ्यांवर कोणतीही कार्यवाही करु नये,  ज्यांना बडतर्फ , निलंबित केले आहे, त्यांना पुन्हा सेवेत घ्या,  असी देखील सुचना न्यायालयाने एसटी प्रशासनास केली.कर्मचाऱ्यांना एक संधी देण्याची गरज न्यायालयाने आपल्या निकालपत्रात व्यक्त केली. हिंसा किंवा दंगलसद्रुष्य परीस्थिती निर्माण करणाऱ्या कर्मचाऱ्यांबाबत महामंडळाची भुमिका काय ?याबाबत आपले म्हणणे 7एप्रिलला सादर करण्याचे आदेश न्यायालयाने दिले.संपकरी लोकांच्या मते त्यांच्या कोणत्याही व्यक्तीने हिंसा केलेली नाही. राज्य सरकार चार वर्षे मह...

आवाज आवडे दक्षिण आशियातील लोकांना

इमेज
        काल  भारतातील खासगी मालकीची आंतरराष्ट्रीय बातम्या भारतीय उच्चाराच्या इंग्रजीत देणारी, wion news ही वृत्तवाहिनी बघत होतो. या वृत्तवाहिनीवर अनेक उत्तम इतर वृत्तवाहिन्यावर क्वचितच हातळतील अस्या विषयाचा बातम्या असतात.जसे मानसिक अनारोग्य, हवामान बदलामुळे शेती उत्पादनावर होणारा परीणाम , तसेच विविध किनारी प्रदेशात राहणाऱ्या लोकांना समोरे  जावे लागणाऱ्या समस्या, बँटरीच्या विल्हेवाट लावणाऱ्या गुजरातच्या किनाऱ्यावरील लोकांची स्थिती, वगैरे. मी टिव्ही बघत असताना  ध्वनी प्रदुषणाबाबत माहिती देणारा कार्यक्रम त्यावर लागला होता.           या कार्यक्रमात सांगितल्याप्रमाणे जगात सर्वाधिक ध्वनीप्रदूषण बांगलादेशाची राजधानी ढाका या शहरात होते. दुसऱ्या क्रमांकावर उत्तर प्रदेशातील मुरादाबाद हे शहर आहे. तिसऱ्या क्रमांकावर पाकिस्तानची राजधानी इस्लामाबाद तर चौथा क्रमांक बांगलादेशातील राजशाही या शहराने पटकावला आहे.ज्यामुळे दक्षिण भारतीय लोकांना गोंगाट आवडतो हे सिद्ध होत आहे.  या कार्यक्रमात सांगितल्याप्रमाणे ढाका शहरात अनेक कारणांमुळे ध्वनीप्...

तूच आहे तूझा मारेकरी

इमेज
              नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या एका संयुक्त राष्ट्रसंघाच्या अहवालानुसार जगात ज्यात भारत देखील आला, त्यात खुनापेक्षा जास्त लोकांचे मृत्यू हे आत्महत्येमुळे होत आहे. जगात मेलेल्या व्यक्तींच्या कारणांची क्रमवारी बघीतल्यास त्यास आत्महत्याचा क्रमांक बराच वरचा आहे. भारतासह जगभरातील स्थिती किती धोकादायक आहे? याची ही लिटमस्ट टेस्टच म्हणायला हवी, खुन हा दुसऱ्या व्यक्तीकडून करण्यात येतो.मात्र आत्महत्या हा स्वतः चाच हाताने स्वतःचा केलेला विनाश असतो.त्याची संख्या जास्त दिसून येणे समाजाच्या अनारोग्याचेच स्पष्ट लक्षण आहे.              माणसे विविध कारणांनी आत्महत्या करतात,ज्यामध्ये  एखादा असाध्य विकार, कौंटुबिक ताणतणाव, व्यसनाधिनता, आर्थिक परीस्थिती खालवणे,जवळच्या व्यक्तींकडून होणारी भावनिक फसवणूक आदि कारणांचा समावेश करावाच लागेल.कारण काहीही असले तरी , त्यांची संख्या चिंताजनक आहे, याबाबत कोणालाही संशय नसावा            वाढती गळेकापू स्पर्धा,व्यक्तीस्वातंत्र्याचा अतिरेक करत त्याचे स्वैराचारात...