पोस्ट्स

आपली एसटी बदलतीये !

इमेज
      आपली एसटी बदलतीये ! होय आपली एसटी बदलतीये .एकेकाळी अस्वचतेचे आगर समजण्यात येणाऱ्या  बस्थानकांचे रुपडे पालटत आपली एसटी आता अधिकाधिक प्रवाशी हिताय होण्याकडे वेगाने वाटचाल करत आहे . एसटीच्या वाढेल तिथे प्रवास सारख्या योजनांचा फायदा घेत आपल्या एसटीतून फिरल्यास हि बाब सहजतेने लक्षात येते . बस्थानकातून बाहेर पडणाऱ्या आणि बस स्थानकात येणाऱ्या बसेसची माहिती विनासायास प्रवाश्याना व्हावी यासाठी एस्टीविशेष प्रयत्नशील असल्याचे सहजतेने समजते . वेळोवेळी होणारे  बसेसच्या वेळापत्रकातील बदल नव्याने सुरु होणाऱ्या बसेसची नोंद , बंद झालेल्या बसेसची माहिती रद्द करण्याची प्रक्रिया बस्थानकावर लावलेल्या वेळापत्रकात न करणे . किंबहुना वेळापत्रक वाचता आले तरी बेहत्तर या प्रकारच्या पद्धतीचे वेळापत्रक भिंतीवर टांगने वेळापत्रकाच्या ठिकाणी बसेसची माहितीच्या ऐवजी अन्य जाहिरातीच दिसणे त्यामुळे बसेसची व्यवस्थित माहिती ना मिळणे  . बसस्थानकात वेळापपत्रक असलेल्या भिंतीनजीक असलेली अस्वच्छता ज्यामुळे वेळापत्रक बघणे हा एक त्रासदायक अनुभव या पूर्वी असायचा मात्र हे सर्व इतिहासजमा करण्याचा चं...

पाकिस्तानचे बुमरँग

इमेज
आँस्टेलियातील  आदिवासी बुमरँग नावाचे शस्त्र वापरात,जे शिकारीच्यावेळी एखाद्या प्राण्याला फेकुन मारल्यावर सुरक्षीतपणे परत व्यक्तीचा हातात येते. मात्र आदिवासींनी  प्राण्यास बुमरँग मारल्यावर ते एखाद्या वेळी फेकणाऱ्यास देखील इजा पोहचवते. असाच काहीसा बुमरँग उलटण्याचा अनुभव सध्या पाकिस्तान घेत आहे.  स्वतः च्या फायद्यासाठी ज्या अफगाणिस्तानमध्ये धर्मांध तालिबानचे विषारी झाड लावले,त्याचीविषारी  फळे आता पाकिस्तानला चाखावी लागत आहेत. पाकिस्तानचा अफगाणिस्तान मधील अँबेसी समोर झालेल्या शक्तीशाली स्फोटात पाकिस्तानचा अफगाणिस्तानमधीलअँबेसिडर आणि त्यांचा डायव्हर गंभीर जखमी झाले आहेत. शुक्रवार 2डिसेंबर रोजी रात्री हा स्फोट झाला.या दोघांचा मृत्यू अगदी थोडक्यात बचावला असे प्रसिद्धीपत्रक पाकिस्तानच्या परराष्ट्र खात्यामार्फत काढण्यात आले आहे. सयुक्त राष्टसंघात देखील याचा निषेध करण्यात आला यावरुन या स्फोटाची भीषणता आपण समजू शकतो      भारताच्या विरूद्ध वापरता यावा यासाठी पाकिस्तानने दूबळ्या अफगाणिस्तानची निर्मिती केली.अफगाणिस्तानला दुबळा करण्यासाठी तेथील कट्टरतेला पाकिस्तानकडून...

महिलांच्या स्वातंत्र्याची नवी पहाट !

इमेज
डिसेंबर महिन्यातील पाहिला रविवार जागतिक स्तरावर महिलांचा विचार करता अत्यंत महत्त्वाचा ठरला .   इराण या देशातील महिलांच्या त्रासास कारणीभूत असणाऱ्या मॉरल पोलीस   हा प्रकार समाप्त करत असल्याची   घोषणा देशातील सत्ताधिकारी वर्गाने करण्याचा तो दिवस आहे .   इस्लाममधील शिया हा पंथ ज्या देशाचा अधिकृत धर्म आहे असा जगातील एकमेव देश अशी ओळख असलेल्या इराणच्या सत्ताधिकरी वर्गाने घेतलेल्या या निर्ययाचे वर्णन   महिलांच्या स्वातंत्र्याची नवी पहाट असे केल्यास वावगे ठरणार नाही . पाकिस्तानबरोबर सीमा असणाऱ्या इराण या देशापासून सुरु होणाऱ्या आखाती प्रदेशात महिलांवर अनेक बंधने आज २०२२ साली देखील आहेत या अनेक बंधनांपैकी एक बंधन गळून पडून महिलांच्या स्वातंत्र्यबाबत एक पाऊल पुढे पडणें जगातील महिलांच्या संदर्भात अत्यंत महत्त्वाचे आहे याच आखाती प्रदेशातील सौदी अरेबिया हा देश महिलांना ड्रायव्हिंगची परवानगी देणारा जगातील शेवटचा देश होता . हि बाब आपण लक्षात घेयला हवी वाहन ...

भारत बदल राहा है

इमेज
  गेल्या काही वर्षांपासून भारताचे परराष्ट्र धोरण अत्यंत आक्रमक होत आहे   तसेच भारताचे लष्करी सामर्थ्य देखील वाढत आहे १ डिसेंबर रोजी भारताच्या परराष्ट्र खात्यामार्फत आयोजित करण्यात आलेल्या साप्ताहिक पत्रकार परिषदेत याचा अनुभव जगाने घेतला . एका वृत्तवाहिनीच्या पत्रकाराने भारत आणि अमेरिका यांच्यात सध्या   सुरु असलेल्या युद्धाभ्यासाबाबतच्या मुद्यावरून चीनने घेतलेल्या   आक्षेपावर प्रश्न विचारला असता त्यास परराष्ट्र खात्याचे प्रवक्ते   अरिंदम बागची यांनी दिलेल्या उत्तरावरून   भारत हा आता   पूर्वीचा राहिलेला नसून अरे रा कारे म्हणणारा सामर्थ्यवान भारत झाला आहे हे जगाला पुन्हा एकदा समजले या आधी सुद्धा परराष्ट्र संबधाबाबतच कठोर भूमिका घेतल्याने भारत बदलला आहे यावर शिक्कमोर्तबाच झाले आहे      तर मित्रानो सध्या भारत आणि अमेरिका दरम्यान उत्तराखंड येथील औली या ठिकाणी भारत आणि अमेरिका यांच्या दरम्यान लष्करी युद्धाभ्यास सुरु आहे हा   युद्धा...

४५१ वर्षानंतरची ६१ वर्षे

इमेज
   गोवा ,  ४५१ वर्षे युरोपीय देशाच्या अमलाखाली असणारा प्रदेश , भारत   ब्रिटिशांकडून १९४७ ऑगस्ट रोजी स्वतंत्र झाल्यावर   १४ वर्ष १२६ दिवसांनी स्वतत्र झालेला भारतातील भूभाग म्हणजे गोवा   युरोपीय सत्ताधाधिशानी समुद्रमार्गे भारतातच्या ज्या भूभागावर पहिल्यांदा पाऊल ठेवले तो भूभाग म्हणजे गोवा . पोर्तुगाल या युरोपीय देशाने ज्या भारतीय भूभागाला ओव्हरसिस पोर्तुगाल म्हणून मान्यता देण्याची गोष्ट केली डिसेंबर १९६१   नंतर   काही काळ सातत्याने   आणि आज   देखील कधी कधी पोर्तुगाल ज्या भारतातच्या भूभागाबाबत   भारताने   तो भाग अनधिकृतपणे ताब्यात ठेवला असा आरोप   करण्यात येतो तो भाग म्हणजे गोवा .  पंडित नेहरूंच्या मुत्सद्दीपणाची खंबीरपणाची साक्ष देणारी धाडसी कृती म्हणून ज्या ऑपरेशन विजय चा उल्लेख करण्यात येतो .  ते ऑपरेशन विजय ज्या भूभागासाठी होते तो भूभाग म्हणजे गोवा पंडित नेहरू यांच्या कार्यकाळाच्या मागोवा घेताना सातत्याने त्यांनी...