पोस्ट्स

एका उत्तम व्यवस्थेवर विनाकारण उडालेले शिंतोडे

इमेज
            गेला आठवडाभर टीव्हीवर कोणत्या बातम्या दाखवल्या जात आहेत ? याचा आढावा घेतल्यास आपणास सर्वाधिक वेळ पूजा खेडकर यांच्याविषयीच्या बातम्यांनी व्यापलेला दिसतो . या बातम्या देताना काही माध्यमांनी विशेषतः इंग्रजी माध्यमांनी काहीही चूक नसताना, त्यामध्ये केंद्रीय लोकसेवा आयोगाला मध्ये खेचले सहजतेने लक्षात येते . मराठी वृत्तवाहिन्यांच्या युट्युब चॅनेलवरील प्रतिक्रिया वाचल्यातर नंतर  सर्वसाधारणपणे याच प्रकारच्या प्रतिक्रिया आपणास  बघावयास मिळतात . अमेरिकेत अशी कायम स्वरूपाची  नोकरीची हमी देणारी प्रशासकीय यंत्रणा नाही  मात्र स्वातंत्र्य मिळाल्यावर ७५ वर्षे होऊन देखील आपण ब्रिटिशकालीन प्रशासनव्यवस्था का अमलात आणत आहोत अशा त्रागा करणारा एक चर्चेचा कार्यक्रम एका सुप्रसिद्ध इंग्रजी वृत्तवाहिनीवर तितकाच किंबहुना कणभर जास्तच प्रसिद्ध असलेल्या वृत्तनिवेदकाने केलेला  मी बघितला केंद्रीय लोकसेवा अयोग्य सुद्धा भ्रष्ट झाला आहे सखोल चौकशी केल्यास हिच्यासारखे अजून ५६ अधिकारी सापडतील आय ए एस अधिकारी होणे आता फक्त पैसेवाल्या लोकांचेच काम आहे ज्या हात...

*पूजा खेडकर प्रकरणाने जन्म दिलेले काही प्रश्न*

इमेज
लोकशाहीच्या चार स्तंभापैकी एक असणाऱ्या, प्रशासनाच्या पोलादी चौकटीत बनावट कागदपत्राद्वारे प्रवेश करणाऱ्या सनदी अधिकारी पूजा खेडकर यांचे प्रकरण सध्या समस्त भारतात गाजत आहे. पंतप्रधान कार्यालयाने पूजा खेडेकर यांची चौकशी करण्याचे आदेश देण्यापर्यंत या प्रकरणाची व्याप्ती आहे. पंतप्रधान कार्यालयाने एक सदस्यीय आयोग नेमला आहे. आयोगाच्या चौकशीत पूजा खेडकर दोषी आढळल्यास  सेवेतून बडतर्फ करण्यासह,  नॉन क्रिमीलेयर नसताना नॉन क्रिमीलेयर असल्याचे खोटे प्रमाणपत्र दाखवल्यामुळे, खोटे जातीचे प्रमाणपत्र दाखवून प्रवेश केल्यामुळे होणारी कार्यवाही म्हणजेच  दोन वर्ष कारावास तसेच खोटे अपंगत्वाचे प्रमाणपत्र दाखवून सेवेत प्रवेश केल्याप्रकरणी तीन वर्षाच्या सक्षम कारावासाची क्षिक्षा होऊ शकते. आता त्यांना  क्षिक्षा होइल तेव्हा होईल, किंवा त्या निर्दोष ठरतील. आता यातील काय होते?, ते येणार काळच ठरवेल, त्याबाबत आताच काही भाष्य करणे धाडसाचे ठरेल. असो.    मात्र पुजा खेडकर प्रकरणाने अनेक प्रश्नांना जन्म दिला आहे. नवी दिल्लीच्या मुखर्जी नगर आणि करोल बाग या परीसरात किंवा आपल्या पुण्याचा नवी पेठ,...

कॅन्डिडेट स्पर्धेत सहभागी भारतीय खेळाडूंचा तौलनिक आढावा

इमेज
मित्रानो,जागतिक बुद्धिबळ अजिंक्यपद स्पर्धत विद्यमान बुध्दिबळ विश्वविजेता डिंग लिरेन यांच्याशी कोण दोन हात करत,  त्यांना विश्वविजेता या पदासाठी कोण, आव्हान देणार?  हे ठरवणाऱ्या कॅन्डिडेट २०२४ या स्पर्धेसाठी आता मोजकेच दिवस शिल्लक राहिले  आहेत कॅनडातील टोरांटो शहरात ३ते २२एप्रिल दरम्यान ही स्पर्धा  होणार आहे.या स्पर्धेतील विजेता विश्वविजेत्यास आव्हान देत असल्याने या सर्व खेळाडूंचा तौलनिक आढावा घेणे ,हे कोणत्याही बुद्धिबळप्रेमींसाठी आवश्यक आहे.  या अभ्यासातून आपण कोणत्या खेळाडूला कॅन्डीडेट स्पर्धा जिंकण्याची, अधिकची संधी असेल ? याबाबत अधिक अचूक अंदाज बांधू शकतो  अर्थात या स्पर्धेतील सर्वच खेळाडू एकमेकांना तुल्यबळ आहेत मात्र तरी त्यांच...

माझे वाचन (भाग३)

इमेज
मला आठवतं माझ बालपण चांदोबा, ठकठक, चंपक किशोर आदी मासिकांनी समृध्द केल. काही दिवसापुर्वी मी पेपर स्टाँलला भेट दिली असता जाणवले की काही कार्टुन काँमिक्सचा अपवाद वगळता बहूतेक बालसाहित्य बंद झालंय .रविवारी येणाऱ्या  वृत्तपत्राच्या बालसाहित्याचा पुरवण्यांनी वाचनाची गोडी लावली . आजकाल अपवाद वगळता वृत्तपत्रांनी बालसाहित्याची पुरवणी देणे बंदच केलंय. त्यामुळे ज्यामुळे मला वाचनाची गोडी लागली.ती गोष्ट सध्याचा मुलांना मिळणे काहीसे अवघड आहे.आताच्या मुलांच्या पालकांना आता अन्य स्त्रोत शोधून आपल्या पाल्यांना वाचनाची गोडी लावावी लागेल. पुढे माध्यमिक शाळेत असताना शाळेतील ग्रंथपालांनी माहितीपर पुस्तकांची गोडी लावली त्यामुळे माझे ज्ञान समृद्ध होण्यास मदत झाली  मी लहानपणी नाशिक येथील सार्वजनिक वाचानालयाचा बालविभागाचा सक्रिय सभासद होतो.त्यामुळे देखील माझे वाचन बरेच समृध्द झाले मला अनेक व्यक्ती लहानपणी माझी आवड लक्षात घेवून गोष्टींची पुस्तके भेट स्वरूपात देत असे‌.त्यातून माझी वाचनाची आवड घट्ट होत गेली आता देखील लहान मुलांना भेट देताना आवर्जून पूस्तकेच भेट दिली तर त्यांना वाचनाची गोडी लागू शकते‌.‌क...

जागतिक स्तरावरच्या अभिजात साहित्यिकांची ओळख मराठी भाषिकांना करून देणारे पुस्तक "झपुर्झा भाग ३"

इमेज
   साहित्याला जगाचा आरसा समजण्यात येते. जगात जे काही चांगले वाईट घडते,ते सर्व साहित्यिक आपल्या लेखनाद्वारे समाजापुढे मांडतो. त्यामुळे साहित्याचे वाचन केल्यास आपणास प्रत्यक्ष अनुभव आला नाही,तरी समाजातील चांगल्या वाटायची आपणास योग्य प्रकारे जाण होते. त्यामुळे साहित्याची निर्मिती करणारा साहित्यिक अत्यंत महत्त्वाचा आहे,समाजाचे जमेच्या बाजू उणिवा त्याला कश्या दिसतात,यावर त्याचे साहित्य कसे असेल?ते खरंच समाजाचे प्रतिनिधित्व करेल का,?हे ठरते‌.विचारवंता सारखाच साहित्यिक हा त्या विशिष्ट काळाचे अपत्य असतो. त्यामुळे साहित्यिकांचा चरित्रांचा  अभ्यासावरून त्या काळाचा अंदाज बांधता येतो.तसेच त्या साहित्यिकांचे लेखन किती अस्सल समजायचे ते समजते. आपल्याकडे साहित्यिकांच्या चरित्रांचा अभ्यास करणारी पुस्तके कमीच आहेत.त्यातही जी आहेत ती मुख्यतः इंग्रजीतच.अस्सलिखित इंग्रजी समजू शकणारा बोलू शकणारा वर्ग आजही कमीच आहे. आजही बहुसंख्य भारतीय त्यांचा मातृभाषेतच संवाद करतो‌.त्यामुळे बहुसंख्य भारतीय या अभ्यासापासून दूरावतात.नेमकी हीच बाब हेरून मराठीला ज्ञानभाषा होण्यासाठी झटणारे अच्युत गोडबोले यांनी ज...

नाशिकची इत्यंभूत माहिती देणारे पुस्तक, "तपोभूमी नाशिक"

इमेज
नाशिक, महाराष्ट्रातील चवथ्या क्रमांकाचे महत्त्वाचे शहर.स्वातंत्र्यवीर सावरकर,दादासाहेब फाळके, श्रीपाद अमृत डांगे, यांच्यासारख्या अनेक नामवंत व्यक्तींची जन्मभूमी असणारे शहर.जगात ज्या ४ ठिकाणी कुंभमेळा भरतो त्यातील एक ठिकाण म्हणजे नाशिक.खाद्यपेयांचा विचार करता द्राक्ष वाइन निर्यातीद्वारे आपल्या भारताला मोठ्या प्रमाणात परदेशी चलन मिळवून देणारे शहर म्हणजे नाशिक ‌. तर अस्या नाशिकची इतिहास काळापासून जडण घडण कशी झाली.दक्षीण काशी असी ओळख असणाऱ्या या शहर आणि परिसरात कोणकोणती मंदिरे आहेत? त्यांचा इतिहास काय आहे? तसेच प्राचीन काळात नाशिकला  कोणकोणत्या परदेशी पर्यटकांनी भेट दिली आहे? नाशिकचे सांस्कृतिक जीवन कोणत्या पद्धतीने समृध्द आहे? नाशिकची प्रसिद्ध व्यक्तिमत्वे कोणती? नाशिकची जगभरात ओळख असणारा कुंभमेळा मुळात काय आहे? कुंभमेळा कस्या प्रकारे आयोजित करण्यात येतो?नाशिक परिसरात कोणकोणत्या लेण्या आहेत? नाशिक परिसरात नाशिक वगळता कोणकोणती धार्मिक स्थळे आहेत? या सारख्या नाशिकविषयी आपणास पडणाऱ्या असंख्य प्रश्नांची योग्य उत्तरे आपणास हवी असतील तर आपणास महाराष्ट्र टाइम्समध्ये कार्यरत ...

ग्रेनीयर वर्ष २०२३चा सविस्तर वृत्तांत "लोकसत्ता वर्षवेध २०२३"

इमेज
स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या व्यक्तींना गेल्या काळातील चालू घडामोडींचा अभ्यास चटकन होण्यासाठी अत्यंत उपयोगी पडणारा घटक म्हणजे इयर बुक.वर्षभर वर्तमानपत्रांची टिपणे काढून सुद्धा अनावधानाने टिपणातून सुटलेला मुद्दा विषय यांची उजळणी करण्याचा कामात स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या उमेदवारांना ही इयर बुक खुपचं उपयुक्त ठरतात. वर्षभरातील महत्त्वाच्या सर्व मुद्द्यांची माहिती एकाच ठिकाणी मिळत असल्याने, ती वाचून स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या उमेदवारांचा वेळ देखील मोठ्या प्रमाणात वाचतो‌.स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या व्यक्तीं खेरीज पत्रकारांना एखाद्या मुद्द्यावर लेखन करताना संदर्भ म्हणून ही इयर बुक महत्त्वाची ठरतात.इंग्रजीत या प्रकारची अनेक इयर बुक गेल्या कित्येक वर्षांपासून प्रसिद्ध होत आहेत.मात्र त्यांचा वापर करण्यासाठी इंग्रजीवर हुकुमत असणे आवश्यक आहे. आज २०२४साली  देखील अनेक व्यक्ती अस्या आहेत की,,ज्यांची इंग्रजीवर फारशी हुकूमत नाही ‌एम‌.पी.एस.सी. ची तयारी करणारे विद्यार्थी, ग्रामीण भागातील पत्रकार अस्या प्रकारचा मोठा वर्ग यात समाविष्ट  होतो‌. हा वर्ग सदर माहिती इंग्रजीत...