पोस्ट्स

एका दुर्देवी प्रेम त्रिकोणाचा समग्र वेध घेणारे पुस्तक ' व्यस्त ओढीचा त्रिकोण'

इमेज
            आपल्या बॉलिवूडमध्ये अनेक प्रेम कहाण्या प्रसिद्ध आहेत. यातील काही कहाण्या या आनंदायी आहेत . तर काही प्रेम कहाण्यांना मात्र दुर्दैवाची कारुण्याची छाया आहे . या दुःखाची पार्श्वभूमी असलेल्या प्रेम कहाण्यांमध्ये अग्रक्रमामाने नाव येते ते , गुरुदत्त  गीता दत्त आणि वहिदा रेहमान. या जोडीचे . एकीवर नितांत प्रेम असून देखील व्यावसायिक कारणास्तव  जवळ आलेल्या  एका दुसऱ्या व्यक्तिमत्वामुळे अक्षरशः कोंडीत सापडलेल्या गुरुदत्त यांचा या दुर्दवी मृत्यू  या प्रेम कहाणीत झाला . त्यांच्या मृत्यूमुळे आपण एका प्रतिभावंत, कामाप्रती अत्यंत निष्ठावान असेलेल्या, प्रयोगशील,  मात्र मनस्वी हळव्या अश्या अत्यंत हुशार असलेल्या एका ससिने अभिनेत्यासह सिने दिग्दर्शक सिने निर्मेत्यास सिने दिग्दर्शकास आपण तयां अकाली गमावलं . आपल्या बॉलीववूडची खूप मोठ्या प्रमाणात हानी यामुळे झाली त्यांचे एक्ली निधन झाले नसते तर आपण आतापर्यंत आपल्यापासून दूर असलेली ऑस्करची बाहुली अनेकदा पटकावली असती याबाबत कोणाशी शंका नसावी .  गुरुदत्त यांच्या या अकाली जाण्याविषयी अनेकदा अ...

जपानच्या कार्यसंस्कृतीतून देशाची ओळख करून देणारे पुस्तक 'जपान'

इमेज
                              जेव्हा आपण कोणतेही कारण असो आपला प्रदेश सोडुन दुसऱ्या देशात जातो , तेव्हा नवीन प्रदेश आपल्याशी विविध प्रकारे संवाद साधत असतो . तेथील पर्यटनस्थळे आपण ज्या प्रदेशात आलोय , त्या प्रदेशाचा ऐतिहासिक वारसा तसेच त्या प्रदेशावर निसर्गाने केलेली उधळण सांगत असतात , तर आपल्या वास्तवात आपल्या ज्या लोकांशी संपर्क येतो ते लोक त्या लोकांची परदेशी लोकांविषयीची भावना , तेथील कार्यसंस्कृती , तेथील समाजजीवनातील व्यक्तींचे स्थान , त्यांची स्वत : च्या प्रदेशाविषयीची भावना तसेच दुसऱ्या ज्या प्रदेशातून आपण आलेलो असतो , त्या प्रदेशाविषयी जाणून घेण्याची उत्सुकता याविषयी माहिती देत असतात . या संवादातून आपणास त्या प्रदेशाची मोठ्या प्रमाणात माहिती मिळते . या माहितीमुळे आपले त्या प्रदेशाशी आपली नाळ देखील जोडली जावू शकते असी नाळ जोडली गेल्यास आपण सातत्याने त्या प्रदेशात जावू इच्छितो , तेथील लोकांशी आपली मैत्री द...

नशिबाला दोष न देता, विजयश्री खेचून आणणारी प्रेरणादायी व्यक्तीमत्वे

इमेज
जगी सर्व  सुखी कोण आहे ? विचारी मना तूच शोधून पाहे अशी विचारणा  करत समर्थ रामदास स्वामी जगात कोणीच पूर्णतः सुखी नसतो प्रत्येकास काहींना काही दुःख असते (अगदी मुकेश अंबानी याच्या मुलाला असाध्य असा आजार आहे ) फक्त आपण त्या दुःखाला कोणत्या प्रकारे सामोरे जातो . याला मह्त्वाचे असते असा सल्ला देतात जगताना  स्वतःचे दुःख कुरवाळत बसण्याच्या ऐवजी दुसऱ्याच्या दुःखाचा विचार करत अरे याच्या तुलनेत माझे दुःख काहीच नाही असे मानून समाधानी राहावे . हा  जीवन जगण्याच्या सर्वोत्तम उपाय असल्याची शिकवण अनेक मोटिव्हशन स्पीकर देताना बघतो . मात्र  अनेकदा बहुतांश माणसे याकडे दुर्लक्ष करत आपल्याला काय मिळाले आहे याचा विचार न करता आपल्याला काय मिळाले नाही याचा विचार करत दुखी होतात मात्र जगात प्रत्येक गोष्टीला प्रति गोष्ट अस्तित्वात असतेच जसे हिवाळ्याच्या  कडाक्याच्या थंडीला उन्हाळ्या रणरणते ऊन असते जन्मला मृत्यू ही  प्रतिगोष्ट  असणे हे याचे उत्तम उदाहरण आहे . तोच नियम याला देखील लागू होतो काही व्यक्ती आपल्याला  असणाऱ्या अडचणींबाबत काहीही त्रास व्यक्त ना करता त्यास आनंदान...

दृष्टिकोन बदलुया, मौन सोडूया!

इमेज
जगभरात लोक कोणत्या कारणांनी मृत्युमुखी पडतात ? या कारणांचा वेध घेतला असता, त्यातील पहिल्या क्रमांकावर जे लोकांच्या निधनाचे कारण येते ते म्हणजे आत्महत्या होय . एका अंदाजानुसार जगभरात दरवषी ७ लाख ३० हजार लोक आत्महत्या करून जीवन संपवतात . जगभरात दरवर्षी जितक्या आत्महत्या होतात.त्याच्या २० पट लोकांनी आत्महत्येसाठी प्रयत्न केलेला असतो मात्र त्यांचे प्रयत्न अयशस्वी होतात आणि त्यांचे प्राण वाचतात  आत्महत्या ही फक्त त्या व्यक्तीचीच  हत्या नसते तर जी व्यक्ती आत्महत्या करते त्या व्यक्तीच्या जवळचे त्यानंतर  जगूनही मेल्यासारखेच असतात . यामुळे जगभरात  आत्महत्या एक सामाजिक कलंक मानण्यात येतो हा सामाजिक कलंक जगातून नष्ट व्हावा  समाजात आत्महत्येबाबत व्यापक समाजजागृती व्हावी यासाठी दरवर्षी   १०   सप्टेंबर   हा   आत्महत्याविरोधी   जनजागृती   दिन   म्हणून   साजरा   करण्यात   येतो .  हा   दिन   २००३   पासून   जागतिक   आत्महत्या   विरोधी   संघटनेतर्फे ,(The International Association for Suicide...

पश्चिमी आशिया,इस्लामी जगत यांची मुळातून जडणघडण उगडणारे पुस्तक 'अधर्म युद्ध'

इमेज
जगाच्या नकाश्यात आपल्या भारतापासून डावीकडे नजर फिरवायला सुरवात केल्यानंतर इराण देशानंतर समुद्र काहीसा आत गेलेला दिसतो.जगातील सुमारे ६० टक्के नैसर्गिक इंधनाची वाहतूक ज्या प्रदेशातून होते ते इराणचे अखात ते हेच.या इराणच्याआ आखातापासून जगातील अत्यंत स्फोटक प्रदेशाला सुरवात होते जी त्यानंतर समुद्र पुन्हा आत जातो ,त्या ठिकाणाला अर्थात लाल समुद्राला वळसा घालत आफ्रिका खंडाच्या उत्तर दिशेकडील काही देश घेवून स्थिरावते .अरब महाद्विप, पश्चिम आशिया किंवा युरोपीय वसाहातवादी देशांच्या चष्म्यातून बघीतल्यास मध्यपुर्व (middel east)या विविध नावाने ओळखला प्रदेश तो हाच.नैसर्गिक उर्जासाधनांनी अत्यंत श्रीमंत किंबहुना याच श्रीमंतीच्या जोरावर अनेकदा जगाला भंडावून सोडणाऱ्या या प्रदेशाविषयी आपल्या मराठीत काहीसे कमी लिहले गेलेले आढळते‌. जे काही मराठीत लेखन उपलब्ध आहे,त्यामध्ये तेथील पर्यटन स्थळांची माहिती,या प्रदेशात बांधकांम मजूर म्हणून नोकरी करणाऱ्या भारतीयांचे अनुभव विश्व  याचाच जास्त भरणा आपणास दिसतो . मात्र देशांतर्गत राजकारण, तेथील समाजजीवन २०व्या शतकाच्या सुरवातीला त्या भागात नैसर्गिक इंधनाचे साठे सापड...

भारतावर दूरगामी परिणाम करणारी घटना !!!

इमेज
बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हशिण यांनी देश सोडला असून त्यांनी भारतमार्गे लंडनला प्रयाण केल्याचे आपणस एव्हाना माहिती झाले असेलच . बंगलादेशमध्ये लष्कराच्या मदतीने काळजीवाहू सरकार स्थापन कऱण्यात आले असून पुढील सरकार सत्ता स्थापन करेपर्यंत हे काळजीवाहू सरकार सत्ता सांभाळेलअसे या संदर्भात विविध माध्यमामध्ये सांगण्यात येत आहे . बांगलादेशमधील हा सत्ता बदल फक्त त्या देशासाठीच नव्हे तर आपल्या भारतासासाठी देखील अत्यंत महत्वाचा ठरणार आहे   . भारतासाठीचे बदल आपण  तीन   प्रकारात विभाजित करू शकतो . पहिल्या प्रकारात आपण ईशान्य भारताला विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्यात , ईशान्य भारताचा उर्वरित भारताशी असणारा संपर्क वाढवण्यासंदर्भात सध्या   सुरु असणाऱ्या विविध उपाययोजना विचारत घेऊ शकतो . दुसऱ्या प्रकारात आपण भारत आणि बांगलादेश यांच्यात होणाऱ्या व्यापार आणि अन्य तरतुदींचा विचार करू शकतो.तर तिसऱ्या प्रकारात बांगलादेशातील अल्पसंख्याक समाजाचा विचार करु शकतो‌ ईशान्य ...