पोस्ट्स

फेब्रुवारी ५, २०१६ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

मराठी भाषेची सुंदरता

इमेज
मराठी भाषेची सुंदरता 👌 खालील कवितेत २६ वेळा पाणी शब्द आला आहे व वैशिष्ट्य म्हणजे प्रत्येकवेळी पाणी या शब्दाचे विविध अर्थ उलगडतात. ही आहे मराठी भाषेची श्रीमंती. मराठी राज्यभाषा झाली तर अशा समृद्धतेने नटलेल्या भाषेचे आपण पाईक होऊन समृद्ध संस्कृतीचे जोपासक होऊ. रंग पाण्याचे 'पाणी'शब्द हा असे प्रवाही वळवू तिकडे वळतो हा जशी भावना मनात असते रूप बदलते कसे पहा नयनामध्ये येते'पाणी' अश्रू तयाला म्हणती कधी सुखाचे,दुःखाचे कधी अशी तयांची महती चटकदार तो पदार्थ दिसता तोंडाला या'पाणी'सुटते खाता खाता ठसका लागून डोळ्यांतून मग 'पाणी' येते धनाढ्याघरी लक्ष्मी देवी म्हणती अविरत 'पाणी'भरते ताकदीहूनी वित्त खर्चिता डोक्यावरूनी 'पाणी'जाते वळणाचे 'पाणी' वळणावरती म्हण मराठी एक असे बारा गांवचे 'पाणी' प्याला चतुराई यातूनी दिसे लाथ मारूनी'पाणी'काढणे लक्षण हे तर कर्तृत्वाचे मेहनतीवर 'पाणी' पडणे चीज न होणे कष्टाचे उत्कर्ष दुज्याचा मनी डाचतो 'पाण्या'त पाहणे गुण खोटा 'पाणी'दार ते नेत्र सांगती विद्वत्तेचा गुण मोठा शिवराया