पोस्ट्स

ऑगस्ट १४, २०२२ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

भारताच्या स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवात भारताचे बुद्धिबळातील अमृत यश

इमेज
         सध्या सर्वत्र भारताच्या स्वातंत्र्याच्या  अमृत महोत्सवानिमित्याने भारताच्या विविध क्षेत्रातील कार्यक्षेत्राचा आढावा घेण्यात येत आहे . सर्वत्र देशभक्तीचे वातावरण आहे . या भरलेल्या वातावरणात बुद्धिबळ क्षेत्रातून एक अत्यंत आनंदाची बातमी येत आहे भारताच्या स्वातंत्र्यच्या ७५ व्या वर्षात ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या आठवड्यात भारताला ७५ वा  ग्रँडमास्टर  मिळाल्याची ती आनंदवार्ता आहे  भारताला विश्वनाथन आनंद यांच्या रूपाने १९८६ साली भारताला पहिला ग्रँडमास्टर मिळाला त्यानंतर गेल्या ३६ वर्षात ही सातत्याने वाढतच गेली आणि आजमितीस ही संख्या ७५वर पोहोचली आहे . गेल्या काही वर्षात भारतात  सातत्याने ठराविक काळाने ग्रँडमास्टर होत आहेत जे फ़क्त बुद्धिबळ विश्वासाठीच नाही तर समस्त भारतीय क्रीडाविशावासाठी आनंदाची गोष्ट आहे .त्यातही भारताच्या स्वातंत्र्यच्या अमृत महोत्सवाच्या काळात भारतात  ७५ वा ग्रँडमास्टर टायर होणे भारतासाठी आनंदाची गोष्ट आहे       भारताच्या ७५व्या ग्रँडमास्टरचे नाव आहे प्रणव व्यंकटेश . चेन्नईस्थित प्रणवने रोमानियातील बाया मारे येथे लिम्पेडिया ओपन जिंकून तिसरा आणि अंतिम जीएम नॉर्म मिळवू