पोस्ट्स

नोव्हेंबर २८, २०२३ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

भारताचे शेजारी आणि हिंदू धर्म

इमेज
आपला भारत हा धर्मनिरपेक्ष देश असला तरी भारतात हिंदू धर्मीय लोक बहुसंख्येने आहेत,‌हे आपण जाणताच. जगात इस्लाम हा राष्ट्रीय धर्म असलेले 51 देश आहेत. त्यामुळे इस्लामधर्माबाबत कुठेही काही अनुचित घडले तर ते देश पुढे सरसवतात. ख्रिस्ती धर्माबाबत बोलायचे झाल्यास बहुसंख्य यूरोप,आणि उत्तर अमेरिका खंडातील देश त्यांची बाजू घेतात. या उलट  हिंदू धर्माबाबतची गोष्ट  आहे. हिंदू धर्मीय व्यक्तींना भारताशिवाय आधार दिसत नाही  तसेही कुठेही हिंदू व्यक्ती असला तरी त्याचे मुळ कुठेना कुठे आपल्या भारतातच सापडते.त्यामुळे हिंदू धर्मियाबाबत जगात कुठे काही झाले तर त्याचे पडसाद आपल्या भारतात उमटतात. आणि ते देश आपल्या सभोवतालचे असले तर त्यात अजूनच भर पडते.हे सांगायचे कारण म्हणजे हिंदू धर्मीयांबाबत नेपाळ आणि बांगलादेश यामध्ये घडणाऱ्या गोष्टी.      तर देशाचा राष्ट्रीय धर्म हिंदू करावा या मागणीसाठी सध्या नेपाळमध्ये आंदोलन सुरू आहे.सन 2008पासून नेपाळ धर्मनिरपेक्ष राष्ट्र आहे.सन2008चा आधी नेपाळ जगातील एकमेव हिंदू राष्ट्र होते. 2008मध्ये लागू करण्यात आलेल्या संविधानानुसार सत्तेत आलेल्या साम्यवादी पक्षांनी नेपाळ धर्मनिरपेक्ष