पोस्ट्स

जून ४, २०२० पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

बिबट्याच्या शहरात वावर आणि हत्तीणीच्या मृत्यू

इमेज
               गेल्या आठवड्याभरात दोनदा प्राणिजीवन आणि मानवीजीवन यातील संघर्ष पाहण्यात आला . पहिला संघर्ष बघितला तो नाशिक या शहरातील भर लोकवस्तीत असणारा  बिबट्यांचा वावर  आणि दुसरा अर्थात केरळमधील हत्तीणीचा दुर्दैवी मृत्यू . यातील हत्तीणीचा मृत्यू ही अत्यंत दुःखद घटना आहे . यातील दोषींना योग्य ते शासन झालेच पाहिजे , यात शंका नाही . मात्र या दोन्ही घटनांकडे बघताना एका सामाईक गोष्टींकडे दुर्लक्षून चालणार नाही , आणि तो म्हणजे प्राणीजीवनाचा मानवी वस्तीतील शिरकाव .                                 वाढत्या लोकसंख्येमुळे घटणारे वनक्षेत्र,  त्यामुळे अन्नाच्या शोधात वन्यजीवांचे  मानवी वस्तीत  येणे,  आणि वन्यजीवांतील तृणभक्षक प्राण्यांनी  शेतीची नासधूस करणे , तसेच मांसभक्षक प्राण्यांनी पाळीव जनावरे नष्ट करणे . याला अटकाव करण्यासाठी मानवांनी केलेल्या उपाययोजनेत वन्यजीवांचा मृत्य होणे या बाबींचा विचार या निमित्याने करावा लागतो .केरळमधील हत्तीणीच्या मृत्यूमुळे हा मुद्दा जरी चर्चिला जात असला तरी काही महिन्यापूर्वी आपल्या महाराष्ट्रातील सिंधुदुर्ग जिल्ह्यातील गोवा राज्याला लागून असणाऱ्या दोडामार्