पोस्ट्स

ऑगस्ट ९, २०२२ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

पाकिस्तानातील राजकारणाचे बदलते रंग

इमेज
         सध्या पाकिस्तानात राजकारण एका वेगळ्याच स्थितीवर पोहोचले आहे पाकिस्तानच्या स्वतंत्रदिनाच्या एक दिवस आधी अर्थात १३ ऑगस्ट रोजी पाकिस्तनचे माजी पंतप्रधान आणि पाकिस्तान तेहरीके इन्साफ या प्रमुख विरोधी पक्षाचे संस्थापक अध्यक्ष इम्रान खान यांनी एका दिवसाच्या आंदोलनांची हाक गेल्या आठवड्यात दिली  त्यावरून पाकिस्तानच्या सत्ताधिकाऱ्यांकडून विविध आरोप केले जात असताना ९ ऑगस्टरोजी  इम्रान खान यांचे सचिव आणि पाकिस्तान तेहरीके इन्साफ या पक्षाचे महत्त्वाचे नेते शाहबाझ गिल यांना  इस्लामाबाद पोलिसांनी मोठ्या नाट्यानंतर अटक केली . पाकिस्तान तेहरीके इन्साफ या पक्षाच्या एका नेत्याच्या ट्विटरमुळे जगाला ही बातमी समजली या  अटकेनंतर ते कुठे आहेत ? या बाबत विविध दावे करण्यात येत आहे .  शहाबाझ गिल यांची अटक करताना  नंबर प्लेट नसलेली गाडी त्यांच्या गाडीला आडवी आली . या गाडीतील लोकांनी तुम्ही आमच्या गाडीचा आरसा का फोडला ? अशी विचारणा करत त्यांना आणि त्यांच्या डायव्हरला मारण्यास सुरवात केली आणि त्यांना फरपटत नेत त्यांना स्वतःच्या गाडीत बसवले असे वृत्त जंगने दिले आहे . हे कमी की काय म्हणून , पाकिस्तानच्या सत