पोस्ट्स

डिसेंबर २४, २०२१ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

महारष्ट्रातील रेल्वे बदलतीये .....

इमेज
          सध्या भारतातील रेल्वे झपाट्याने कात टाकत आहे . त्याचाच परिणामस्वरूप महारष्ट्रातील रेल्वेसुद्धा विद्युतवेगाने बदलत आहे रेल्वे संदर्भात विविध प्रलंबित प्रकल्प झपाट्याने पूर्णत्वाकडे जात आहे यासाठी रेल्वेत प्रशासनिक बदल तसेच पायाभूत सोयीसुविधा उभारणे याचा समावेश होत आहे गेल्या पंधरवड्यात अहमदनगर - परळी रेल्वेमार्ग , कुर्डुवाडी लातुर रेल्वेमार्ग या मार्गाबाबत अनेक चाचण्या घेण्यात आल्या तसेच अंकाई औरंगाबाबाद , मनमाड औरंगाबाद आणि औरंगाबाद परभणी या रेल्वेमार्गाबाबत विविध प्रस्तावास मंजुरी तसेच मध्य रेल्वेचा सोलापूर विभागातील सुमारे २५० किमीचा मार्ग मध्य रेल्वेचा पुणे विभागांतर्गत वर्ग करण्याबाबतचा हालचालीस वेग देणे आदी घडामोडी महाराष्ट्राचा रेल्वेबाबत घडल्या .      आजपासून सुमारे  २५ वर्षांपूर्वी अर्थात १९९५-९६सालच्या रेल्वेअर्थसंकल्पात मंजूर करण्यात आलेल्या मात्र निधीची अपुरी  तरतूद आणि इतर काही  बाबींमुळे फारसे काम न झालेल्या या सुमारे २८५ किमीच्या मार्गाचे काम सध्या वेगाने सुरु आहे या मार्गावरील अहमदनगर ते आष्टी या ६४ किमी मार्गावरील  सर्व रेल्वेपूल ओव्हरब्रीज अंडरपास यांची निर्