पोस्ट्स

जून २४, २०२० पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

रेल्वेची विनाशकारी वाटचाल

इमेज
             सध्याचा अनलाँक 1च्या काळात रेल्वेबाबत दोन दुरगामी परीणाम करणारे बदल झाले . करोना आणि चीनविषयक बातम्यांचा गदारोळात याकडे काहीसे दुर्लक्ष झाले . मात्र येणाऱ्या भावी पिढीवर यामुळे मुलग्रामी परीणाम होणार असल्याने याबाबत मंथन होणे अत्यावश्यक आहे हा लेखनप्रपंच त्यासाठीच .             त्यातील एक बदल समस्त रेल्वेत एकाच वेळी लागू करण्यात आला आहे, तर दुसरा बदल रेल्वेचा पुर्व विभागापुरता मर्यादित असल्याचे सध्या सांगण्यात आले असले तरी कालांतराने तो बदल सगळ्या रेल्वेत लागू होणार हे सर्वश्रुत आहे . सर्वप्रथम पुर्व विभागातील बातमी बघू . पुर्व विभागातील मेल, एक्सप्रेस ,  आरामदायी म्हणता येतील अस्या प्रकारच्या गाड्यांसह एकुण 34 गाड्या कायमस्वरूपी बंद करण्याचा निर्णय रेल्वेने घेतला आहे .या गाड्यांना अधिक थांबे असल्याने रेल्वेचा अन्य वेगवान गाड्यांचा वेगावर अनुचित परीणाम होण्यासह, काही गाड्यांना अपेक्षीत प्रवाशी भारमान मिळत नसल्याचे कारण त्यासाठी रेल्वेने दिले आहे . सर्व भारतात लागू होणारा निर्णय यापेक्षा भयानक आहे . 200किमी पेक्षा अधिक प्रवास करणाऱ्या पँसेजर गाड्यांचे एक्सप्रेस गाड्या