पोस्ट्स

जुलै ६, २०१९ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

टुर द फ्रान्स , सायकलस्वारांची मांदियाळी

इमेज
सध्या समस्त भारतात क्रिकेट विश्वचषकाची चर्चा सुरु असताना तिकडे युरोपात सायकस्वारांची जत्रा अर्थात टुर द फ्रान्स ही स्पर्धा सुरु झालीये . पुढील तीन आठवडे ही स्पर्धा सुरु असणार आहे . या कालावधीत स्पर्धक विविध अडथळ्यांना पार करत ही स्पर्धा जिंकण्याचा आटोकाट प्रयत्न करतील. दर ठराविक अंतरावर उभे राहुन प्रेक्षक स्पर्धकांना प्रोत्साहित करतील . स्पर्धक 3460 किलोमीटर सायकल चालवतील . (भारताची उत्तर दक्षीण लांबी 3214 किलोमीटर आहे) या स्पर्धेचे हे 106वे वर्ष आहे .                 स्पर्धकाच्या शाररीक क्षमतेची ही स्पर्धा जगभरात लोकप्रिय आहे .  जगभरातील 200 देशात हा खेळ खेळला जातोय .आपल्या भारतात आता कुठे  एक साहसी खेळ म्हणून सायकलींगची सुरवात होतीये . यावेळी ही स्पर्धा बेल्जीयम या देशाच्या राजधानीपासून अर्थात बेल्गेर्ड या शहरापासून सुरु होत आहे . स्पर्धेला सुरवात झाल्यापासून तिसऱ्यांदा स्पर्धा  बेल्जीयम देशातून  सुरू होतेय . या तीन पैकी 2 वेळेस स्पर्धा बेल्गेड शहरापासून सुरू होत आहे. 28 जुलैपर्यत ही स्पर्धा चालेल.            आपण पुढील चित्रात तिचा मार्ग बघू शकता . या स्पर्धेच्या मार्गात पर्