पोस्ट्स

जानेवारी ३१, २०२१ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

आर्थिक सर्वेक्षण 2020-2021

इमेज
अर्थसंकल्पीय अधिवेशात मांडला जाणारा अर्थसंकल्पाएव्हढाच महत्तवाचा मात्र काहीसा दुर्लक्षीला जाणारा भाग म्हणजे आर्थिक पाहणी अहवाल. जो अर्थसंकल्पाचा एक दिवस आधी संसदेसमोर मांडला जातो. यावर्षी तो शुक्रवार 29 जानेवारी रोजी मांडला गेला. हा अहवाल मागच्या वर्षाची अर्थव्यवस्थेबाबत भाष्य करत असल्याने हा मागच्या वर्षाचा असतो. तर अर्थसंकल्प पुढील वर्षाचे प्रतिनिधित्व करतो . शुक्रवारी मांडला गेलेला आर्थिक पाहणी अहवाल आर्थिक वर्ष 2020 -21 साठी होता तर सोमवारी मांडण्यात येणारा अर्थसंकल्प 2021-22 या आर्थिक वर्षासाठी असेल   या आर्थिक पाहणी अहवालामध्ये अर्थव्यवस्थेचा गेल्या आर्थिक वर्षातील प्रवाश्याचा आढावा घेतलेला असतो. ज्यामध्ये मागील वर्षी आर्थिक वाढीचा वेग किती होता,पुढील वर्षी तो किती असण्याची शक्यता आहे. अर्थव्यवस्थेसमोरची आव्हाने काय आहेत. अर्थव्यवस्थेचा जमेच्या बाजू काय आहेत. याविषयी माहिती असते. हा अहवाल गेल्या काही वर्षापासून 2 भागात विभागला असतो. याचा पहिला भाग हा जास्त महत्तवाचा मानला जातो. ज्यामध्ये विविध स्वरुपाची विश्लेषणात्मक  माहिती असते अर्थव्यवस्थेचे समग्र चित्र यातून स्पष्ट होते. तर द

एका हुकुमशहाचा अस्त ?

इमेज
                 ही गोष्ट आहे, एका सत्ताधिकाऱ्याची . एक अस्या सत्ताधिकाऱ्याची जो गेली 20 वर्षे सत्तेत आहे. सध्याचा त्याचा कालावधी जर विचारात घेतला तर हा कालावधी होतो तब्बल 24 वर्षे.बर हा सत्ताधिकारी देशाच्या सर्वोच्च स्थानी बसण्याचा आधी त्या देशातील महत्तवाचा शहराचा महापौर असतो. तत्कालीन  सत्ता प्रमुख जो अट्टल मद्यपी असतो. देशातील वाढता असंतोष बघून तो तत्कालीन सत्ताधीश टिव्हीवर जाहिर करतो, मी राजीनामा देत असून माझा उत्तराधिकारी हा असेल. आणि या सत्ताधिकाऱ्याचा जन्म होतो, या सत्ताधिकाऱ्याने याचा आधी त्या देशाच्या गुप्तहेर म्हणून कामही केले असते. देशाच्या संविधानात सलग तीनदा सत्तेच्या मुख्य स्थानी राहण्याची अनुमती नसल्याने तो दोन टर्म झाल्यावर एक टर्म आपल्याच चेल्याला उभा करतो. त्याची टर्म संपल्यावर पुन्हा सत्तेचा मुख्यस्थानी विराजमान होतो. मी बोलत आहे, रशियाचे अध्यक्ष ब्लादमीर पुतीन यांच्याविषयी              सध्या त्यांच्या विरोधात उणे पन्नास अंश सेल्यीयस तापमान असताना रशियाचा सुमारे 70 शहरात निदर्शने चालू आहेत. रशियन पोलीस निदर्शकांवर पाशवी पद्धतीने मारहान करणे,  त्यांच्यावर अश्रूधूराच