पोस्ट्स

मे ३१, २०१९ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

माझे पहिले भाषणाची हकीगत

इमेज
             आपल्याकडे ६४ कला आहेत असे म्हंटले जाते . वक्त्तृवकला ही त्यापैकीच एक . नुकताच मी त्या प्रांतात प्रवेशकर्ता झालो . अर्थात  हे घडले ते अपघातानेच मी काही या क्षेत्रात प्रवेश करायचे काही ठरवले नव्हते . तसे मी बरे लिहायचो ( म्हणजे अजूनही लिहितो बरका ) त्यामुळे काही लोकांसी ओळखीही झाल्या आहेत . अशीच एक ओळख झाली एका व्याख्यान आयोजनकर्त्याशी . माझे लेखन बघून त्यांना काय वाटले कोणास ठाऊक ? त्यांनी मला त्यांचा व्याख्यानांत मला श्रोत्यांना पिळायची परवानगी दिली आणि माझा वक्त्तृवकला या प्रांतात प्रवेश झाला          व्याख्यानमालेच्या आयोजकांशी एक दोनदा बोलणे झाल्यावर अखेर विषय ठरला . विषय माझ्या नेहमीच्या लिखानपेटीतील नव्हता असो , विषय छान होता . जुन्या हिंदी चित्रपटातील नायिकेच्या प्रेमप्रकरणावर हा विषय बेतलेला होता .                 बर पहिल्यांदाच व्याख्यान देणार होतो आणि आयोजकांनी तुम्हाला दीड  तास देणार आहोत , त्याचा पुरेपूर वापर  करा . वेळेचा आधी संपवून टाकून आम्हाला वेळ भरून काढायला सांगू नका असा सज्जड दम भरला असल्याने जरासा चिंतेनेच व्याख्यानाच्या तयारीला सुरवात केली . आयोजकां