पोस्ट्स

मार्च २४, २०२१ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

चित्रपटश्रुष्टीचे काळे सत्य मांडणारा चित्रपट ,कागज के फुल!

इमेज
कालचीच गोष्ट आहे,सध्याचा महाराष्ट्राचा राजकारणाविषयी मित्राशी बोलताना जब्बार पटेल यांनी निर्मिती केलेल्या आणि मात्तबर अभिनेत्यांचा अभियननाने सजलेल्या  सिंहासनाचा विषय निघाला .आमचे बोलणे नंंतर थांबले, माझे मन मात्र वास्तवदर्शी चित्रपटाचा विषयी विचार करण्यात गढून गेले . आपल्या चित्रपटश्रुष्टीत वास्तवदर्शी चित्रपटांची मोठी संख्या आहे. सध्या अस्या चित्रपटांची संख्या वाढलेली दिसत असली, तरी वास्तवदर्शी चित्रपटांचा यादीत  कृष्णधवल काळातील चित्रपट असलेल्या "कागज के फुल" या चित्रपटाचा समावेश करावाच लागेल. किंबहूना गुरुदत्त  फिल्म प्राडक्शनची निर्मिती असलेल्या "कागज के  फुल " या चित्रपटाचा समावेश केल्याशिवाय ही यादी पुर्ण होवूच शकत नाही. एखादा यशस्वी चित्रपट दिग्दर्शक सातत्याने यशस्वी चित्रपट देत असताना चित्रपटश्रुष्टी त्याचाशी किती अबदीने वागते, मात्र एखादा अयशस्वी चित्रपट त्याचा हातातून घडल्यावर एकेकाळी डोक्यावर घेणारी चित्रपट श्रुष्टी त्याचाशी किती तूसडेपणाने वागते. एकेकाळचा यशस्वी चित्रपट दिग्दर्शक चित्रपटातील छोट्याशा भुमिकेसाठी कसा नागावला जातो. त्याने स्वतःच्या अनुभवात