पोस्ट्स

नोव्हेंबर ९, २०२० पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

खगोलशास्त्र प्रेमींना मोठी पर्वणी

इमेज
                            आपल्या भारतात पर्वण्यांना धार्मिकदृष्ट्या अन्यन्य साधरण महत्व आहे. खुप वर्षांनी अथवा दिवसांनी या पर्वण्या येतात, त्यामुळे या दिवशी केलेल्या धार्मिक विधी विधींना विशेष महत्त्व आहे .पुढच्या मंगळवारी अर्थात 17नोव्हेंबरला अशीच एक पर्वणी येणार आहे. मात्र ही पर्वणी धार्मिकदृष्ट्या नाही तर खगोलशास्त्र प्रेमींसाठी अत्यंत महत्त्वाची असणार आहे . आकाशात पुर्व दिशेला या  पर्वणीचा योग असणार आहे                                      या दिवशी सुर्याभोवती 33 वर्षात एक फेरी पुर्ण करणाऱ्या टेंम्पल टटेल या धूमकेतूमुळे पृथ्वीवर  उल्कावर्षाव होणार आहे . दरवर्षी  नोव्हेंबर महिन्यात 14 नोव्हेंबर ते 21नोव्हेंबर या दिवशी  या धूमकेतूमुळे उल्का वर्षाव होत असतो. जो दर 33 वर्षांनी सगळ्यात जास्त होत असतो. या आधी सन 1998 साली तो सगळ्यात जास्त दिसला होता.  दर वर्षीप्रमाणे याही वर्षी  देखील तो  होत आहे . या वर्षी होणाऱ्या उल्का वर्षावाच्या सर्वोच्च क्षण 17 नोव्हेंबर च्या रात्री (18 नोव्हेंबरची पहाट ) रात्री तीनच्या सुमारास आहे. या सुमारास तो पुर्व दिशेला सिंह राशीच्या पार्श्वभुमीवर दिसणार आह