पोस्ट्स

जुलै २४, २०२२ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

विश्वविजेतापदाची रंजकता लयास

इमेज
कोणत्याही खेळाडूची आपण खेळत  असलेल्या खेळात विश्वविजेते होण्याचे स्वप्न असते . आपण खेळत असलेला खेळ ज्या व्यक्ती खेळतात त्या सर्वांना आपण हरवले याचा आनंदच काही और असतो . हा आनंद मिळवण्याचे प्रत्येक खेळाडूचे स्वप्न असते खेळावर प्रेम करणाऱ्या व्यक्तींना देखील आपणास सर्ववोत्तम खेळ बघायला मिळावा अशी अपेक्षा असते . विश्वविजेता देखील अनेक चांगलया खेळणाऱ्या खेळाडूंपेक्षा अधिक चांगला खेळाचे प्रदर्शन करत त्यांच्यावर विजय मिळवत असल्याने खेळावर प्रेम करणाऱ्या खेळप्रेमींची ही अपेक्षा   एखादा खेळाडू विश्वविजेता होत असताना सहज पूर्ण होत असते . जगातील सर्व खेळामध्ये याच प्रक्रियेचा अवलंब करण्यात येतो . मात्र एका खेळासाठी मात्र किमान २०२२ या वर्षी तरी अपवाद करावा लागणार आहे . तो खेळ म्हणजे बुद्धिबळ   बुद्धिबळप्रेमींना या आनंदाला मुकावे लागण्याचे कारण गेल्या पाच वर्षांपासून विश्वविजेता असलेल्या मॅग्नस कार्लसन यांनी  यावर्षी  विशेवविजेते स्पर्धा ना खेळण्याचा घेतलेला निर्णय . गेल्या पाच वर्षांपासून विश्वविजेता असल्याने विश्वविजेता होण्याच्या प्रक्रियेचा कंटाळा आल्याने आपण विश्वविजेता होण्याची स्पर्धा खेळण