पोस्ट्स

जानेवारी २५, २०२२ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

चीनचे शेपुट वाकडेच

इमेज
   भारताचा शत्रू असणारा चीन गेल्या आठवड्यात दोनदा चर्चेत आला होता. दोन्ही वेळेस त्याचा सबंध भारताशी होता.चीन आपला शत्रू असल्याने त्याविषयी आपणास माहिती असणे आवश्यक आहे, तरी समर्थ रामदास स्वामी यांच्या "जे जे आपणास ठाव ते सकलांशी सांगावे, शहाणे करुन सोडावे सकल जन" या उक्तीनुसार सांगण्यासाठी आजचे लेखन.       तर मित्रांनो चीन पाकिस्तानला अत्यंत अत्याधुनिक अस्या आवाजाच्या वेगापेक्षा कितीतरी जास्त वेगाने खुप जास्त अंतर जावू शकेल ,असे क्षेपणास्त्र देवू शकण्याची अमेरीकन थिंक टँंक असणाऱ्या "इंटरनँशनल असायमेंट अँड स्ट्रेटेजी सेंटर कडून व्यक्त करण्यात आली आहे. या संस्थेकडून व्यक्त करण्यात आलेल्या अंदाजानुसार हे क्षेपणास्त्र भारत रशियाकडून विकत घेत असलेल्या एस 400 या क्षेपणास्त्राला तोंड देवू शकतो .या संस्थेत रिचर्ड डि फिशर हे चीनविषयक मोठे तज्ज्ञ कार्यरत आहेत. त्यांचा मते या आधीच चीनने हे क्षेपणास्त्र उत्तर कोरीयाला दिले आहे. पाकिस्तानबाबत चीन तीच गोष्ट करु शकतो.जर पाकिस्तानला अधिकृतपणे देता आले नाही तर उत्तर कोरीयाच्या मार्फत चीन पाकिस्तानला हे तंत्रज्ञान देवू शकतो. त्याचप्रमाणे