पोस्ट्स

ऑगस्ट १०, २०२१ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

अवकाशीय सहली! एक सत्यातील घटना!

इमेज
    विज्ञान कथांमध्ये सांगितलेल्या अनेक गोष्टी भविष्यात वास्तव्यात उतरलेल्या आपण अनेकदा बघतो. आजची भविष्यकाळातील विज्ञानाची संकल्पना उद्याचे प्रत्यक्षातले विज्ञान असते. याच विज्ञानाच्या मालिकेत एक गोष्ट नुकतीच अंतर्भूत झाली आहे, ती म्हणजे अवकाशीय पर्यटन.  विसाव्या शतकाच्या सत्तरचा ऐशींचा दशकात अनेक विज्ञान कथांमध्ये सांगण्यात आलेली ही संकल्पना आज 2021रोजी प्रत्यक्षात उतरत आहे. नुकतेच 11 जुलै रोजी  रिचर्ड  ब्रानसन यांनी अवकाश पर्यटन करुन त्याचा श्रीगणेशा केला आहे. तसे बघता ही संकल्पना या आधीच प्रत्यक्षात आणली गेली आहे.28 एप्रील  2001 साली डेनिस टिटो यांनी पहिल्यांदा मनोरंजनाकरीता अवकाशात पाउल ठेवून याची सुरवात केली आहे. मात्र पैसा मिळवण्यासाठी या संकल्पनेचा वापर करण्यासाठी उपयोग करण्याचे  श्रेय मात्र निर्विवाद यांच्याकडेच  जाते. ज्यांचाकडे प्रचंड पैसा आहे. ज्यांनी जग पालथे घातले आहे. अश्या  लोकांसाठी फिरण्याचे नवे डेस्टीनेशन म्हणून अवकाश मोहिमेला  यांनी सुरवात केली.रिचर्ड  ब्रानसन यांच्या नंतर 9 दिवसांनी  अब्जाधीश उद्योजक जेफ बेझोस यांनी 20 जुलै रोजी अवकाशात पर्यटनाचा हेतूने उड्डाण केले