पोस्ट्स

जुलै १८, २०२१ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

भयानक वास्तवाकडे वाटचाल (भाग8)

इमेज
   नाशिकला पाणीपुरवठा करणाऱ्या धरण क्षेत्रात पुरेसा पाणीसाठा नसल्याने नाशिककरांच्या तोंडाचे पाणी पळाले असताना, जगाचे पाणी मात्र अफगाणिस्तान आणि अफगाणिस्तानमधील वाढत्या तालीबानच्या प्रभावामुळे पळाले आहे.अफगाणिस्तानचे भवितव्य काय असू शकेल ? यावर विविध परीषदा सध्या होत आहे. दुष्यंते या शहरात झालेली शांघाय काँपरेशन आँरगानयझेशन ची परराष्ट्र मंत्र्यांंची परीषद असो, अथवा उझबेकिस्तान ची राजधानी तास्कंद या ठिकाणी सध्या सुरु असलेली दक्षिण आणि मध्य आशियातील देशांची परीषद, सर्वत्र अफगाणिस्तानचाच विचार केला जात आहे.     तास्कंद येथील दक्षिण आणि मध्य आशियातील देशांच्या शिखर परीषदेत अफगाणिस्तानचे राष्ट्रपती हमीद करझाई यांनी जाहिरपणे पाकिस्तानने अफगाणिस्तानात दहा हजार प्रशिक्षीत दहशतवादी सोडले असल्याचा आरोप केला. त्यावेळी त्या सभागृहात भारताचे परराष्ट्र मंत्री एस जयशंकर आणि पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान हे त्यांचा जवळच बसले होते. आपला क्रमांक आल्यावर इम्रान खान यांनी पाकिस्तान स्वतः दहशतवादाचा बळी पडला आहे. गेल्या 15 वर्षात पाकिस्तानात एक हजार लोक दहशतवादामुळे बळी पडले आहेत, असे सांगत पाकिस्तानची