पोस्ट्स

ऑगस्ट ४, २०२१ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

गिलगीट बाल्टीस्तान, भारत पाक संघर्षाचा नवा केंद्रबिंदू

इमेज
        आपल्या महाराष्ट्रात राजकीय लाथ्याळ्यांचा बातम्यांमुळे माध्यमांचे मथळे आणि हेडलाईन्स सजलेल्या असताना भारत आणि पाकिस्तानात यांच्या सबंधावर परीणाम करणारी एक मोठी घडामोड सध्या वेगाने घडत आहे ,जी पाकव्याप्त काश्मीरचा एक भाग असणाऱ्या गिलगीट बाल्टीस्तान या भागासी सबंधित आहे.  ज्यामुळे काश्मीर बरोबर भारत पाक संघर्षाचा नवा बिंदू उदयास येवू शकतो.       तर 2020 नोव्हेंबर 1 रोजी पाकव्याप्त काश्मीर मधील  गिलगीट बाल्टीस्तान हा भाग आपला तथाकथीत स्वातंत्र्यदिन (?) साजरा करत असताना पाकिस्तानचा पंतप्रधान इम्रान खान याने मुझ्झफराबाद येथे जाहिर केल्याप्रमाणे पाकव्याप्त काश्मीरमधील गिलगीट बाल्टीस्तान या भागास पाकिस्तानचा पाचवा प्रांत बनवण्यासाठी आवश्यक असणारा मसुदा तयार करण्यात आला आहे.  जो आता तेथील केंद्रीय विधीमंडळापुढे मांडण्यात येईल. तिथे मंजूर झाल्यावर पाकिस्तानचा पाचवा प्रांत म्हणून पाकव्याप्त काश्मीरमधील गिलगीट बाल्टीस्तान अस्तित्वात येईल, असे वृत्त द हिंदूने आणि बिबिसीने दिले आहे.       भारताने या बातमीवर अद्याप अधिकृत मत नोंदवलेले नाही. मात्र भारताचा या बाबत पुर्वीपासूनच विरोध होता. भारत