पोस्ट्स

ऑक्टोबर २३, २०२० पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

भारत बांगलादेश मैत्री नव्याने उमलताना

इमेज
      बांगलादेश, दक्षिण आशियातील असा देश जो ज्याची आपल्या भारताबरोबर सर्वाधिक लांबीची सीमा आहे , ज्या देशातील 8  प्रशासकीय विभागापैकी 6 प्रशासकीय विभागात आपणास जमिनीवरून चालत जाता येते . तर एका प्रशासकीय विभागता आपण समुद्रमार्गे सहजतेने जाऊ शकतो . ज्या देशाची अधिकृत भाषा आपल्या एका राज्यची देखील राज्यभाषा आहे . तसेच ज्याच्या आर्थिक क्षमतेबाबत आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने दिलेल्या एका अहवालामुळे भारताची आणि बांगलादेशच्या आर्थिक आर्थिक क्षमतेविषयी विविध चर्चाना भारतात सुरवात झाली  तर अश्या बांगलादेशाबरोबर आपल्या भारताचे  सहकाऱ्यांचे नवे पर्व सुरु झाले आहे .आपल्या भारताच्या एका कोपऱ्यात असणाऱ्या ईशान्य भारताच्या विकासास ठी तसेच  आंतराष्ट्रीय पातळीवर भारताची ताकद वाढवण्याबरोबरच स्वविकासात देखील बांगलादेश भारताला मदत करत आहे आणि स्वतःचा विकास देखील करत आहे . मराठी माध्यमात या विषयी अत्यंत कमी बोलले गेल्याने जे जे आपणासी ठाव ते ते सकळांसी सांगावे , शहाणे करून सोडावे सकल जण या समर्थांच्या उक्तीनुसार या विषयी माहिती देण्यासाठी आजचे लेखन   सर्वप्रथम भारतचे आंतरराष्ट्रीय संबंधात महत्व वाढवणारी बांगल

बांगलादेश दक्षिण आशियातील आर्थिक महासत्ता ?

इमेज
बांगलादेश, दक्षिण आशियातील एक असा देश, ज्या देशातून भारतात येणाऱ्या लोकांच्या संख्येवर एकेकाळी येथील राजकीय पक्षांचे राजकारण भरभराटीस आले. ज्याला पाकिस्तानपासून वेगळे करून भारताने पाकिस्तानचे आर्थिक विश्व जवळपास नष्ट केले(सन 1947 ते 1971 पर्यत पाकिस्तानने जी जलद आर्थिक प्रगती केली, त्यात खुप मोठा वाटा त्यावेळच्या पुर्व पाकिस्तानातून आलेल्या समृद्धीचा होता. कराची सोडून इस्लामाबाद म्हणून नवी राजधानी तत्कालीन पुर्व पाकिस्तान च्या पैसामुळेच करु शकला .हे जगजाहिर आहेच) ज्या बरोबर भारत आपल्या इशान्य भारताचा विकास करण्यासाठी सयुंक्त प्रयत्न करत आहे. तर अशा बांगला देश नुकताच एका कारणामुळे विशेष चर्चेत आला , ते म्हणजे आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने (IMF )भारताच्या आणि बांगलादेशाच्या आर्थिक स्थितीबाबत केलेले विधान आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने नुकत्याच प्रसिद्ध केलेल्या अहवालानूसार एका आर्थिक वर्षात देशात उत्पादित झालेल्या सर्व वस्तूंचे आंतीम एकत्रीत मुल्य ( कच्या मालाची किंमत नाही म्हणजेच उसापासून साखर तयार केली तर साखरेची किंमत उसाची किंमत नाही) अर्थात जिडिपी आणि लोकसंख्या यांचे गुण्णोत्तर म्हणजेच जिडिपी