पोस्ट्स

नोव्हेंबर १०, २०२३ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

एसटीच्या खासगीकरणाचे अजुन एक पाऊल

इमेज
        आपल्या महाराष्ट्राची खरी जीवनवाहिनी म्हणून एसटी ओळखली जाते.ग्रामीण महाराष्ट्रातील अनेक मुलींचे शिक्षण निव्वळ एसटीमुळे सुरु आहे.असे म्हटल्यास वावगे ठरू नये,असि स्थिती आहे.अनेक खेडेगावातील,वस्ती, पांडे यात राहणारे पालक एसटीची सेवा आहे,म्हणून राहण्याचा ठिकाणाहून अन्य ठिकाणी शिकायला पाठवतात. जर एसटी बससेवा नसेल तर हे पालक खासगी वाहतूकदारांच्या भरवस्यावर त्यांना शिकायला पाठवणार नाहीत हे नाकारण्यात काही अर्थ नाही. एसटी विद्यार्थ्यांना भांड्यात सुट देते जी खासगी वाहतूकदार कदापी देणार नाहीत. तसेच ज्या ठिकाणाहून एखादं दुसराच प्रवाशी मिळतो अस्या ठिकाणाहून सुद्धा खासगी वाहतूकदार आपली सेवा देणार नाहीत, तसेच एसटी मात्र लोकसेवेच्या आपल्या ब्रीदवाक्यामुळे प्रसंगी तोटा सहन करत या ठिकाणाहून देखील आपली सेवा देते त्यामुळे एसटी खऱ्या अर्थाने महाराष्ट्राची जीवनदायिनी आहे.          मात्र मात्र ही महाराष्ट्राची जीवनदायिनी बंद करण्याचे शासनाचे प्रयोजन तर नाही ना ?असे वाटावे अस्या घटना नुकत्याच उघडकीस आल्या. सर्वसामान्य लोकांची लालपरीसुद्धा खासगी वाहतूकदारांमार्फत चालवण्याची सुरवात हीच ती