पोस्ट्स

मे ८, २०२२ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

मुद्दे आपले मुद्दे त्यांचे

इमेज
           येत्या २१ मे रोजी ऑस्ट्रेलिया या देशात तेथील  आपल्या लोकसभा समकक्ष सदनाच्या निवडणुका होणार आहेत त्यासाठी  ऑस्ट्रेलिया  या देशातील वातावरण सध्या चांगलेच ढवळून निघत आहे . २१ मे ही प्रत्यक्ष मतदानाची तारीख असली तरी ज्या नागरिकांचे कोणाला मत देयचे हे ठरलेले आहे ते नागरिक ९ मे १८ मे दरम्यान आगाऊ मतदान देखील करू शकतात . नागरिकांनी पोस्टाद्वारे केलेले मत ऑस्ट्रेलिया निवडणूक आयोगापर्यंत ३ जुनपर्यंत फोहोचण्याची दक्षता नागरिकांना घ्यावी लागणार आहे . ऑस्ट्रेलिया देशातील लोकसभेची मुदत ३ वर्षे आहे मागील निवडणुका १८ मे २०१९ रोजी झाल्या होत्या  ऑस्ट्रेलियन संसद सुद्धा आपल्या सारखीच द्वि सदनी आहे आपल्या राज्यसभा समकक्ष ऑस्ट्रेलियन सदनाची सर्वसाधारणपणे मुदत ६ वर्षे आहे याला अपवाद आहे ऑस्ट्रेलिया  या देशाच्या केंद्रशासित प्रदेशातील सदस्यांच्या त्यांची मुदत मात्र ३ वर्षे आहे . जी त्यांच्या लोकसभेबरोबर संपते . मात्र ऑस्ट्रेलिया या देशातील राज्याच्या कडून निवडण्यात आलेले सदस्य मात्र ६ वर्षे पदावर राहतात . त्यांच्या लोकसभेत बहुमत असणारा पक्ष किंवा पक्षांची आघाडी सरकार तयार करते      आपल्यापैकी अ