पोस्ट्स

ऑगस्ट ३, २०१९ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

काश्मीर , भुराजनैतिक स्थानामुळे बनलेले अग्नीकुंड

इमेज
सध्या आपल्या भारतात राष्ट्रीय स्तरावर एकच मुद्दा चर्चीला जातोय , तो म्हणजे काश्मीर . केंद्र सरकारतर्फे  सध्या काश्मीरमध्ये मोठ्या प्रमाणात  सैन्य तैनात केलं जातंय . लवकरच काश्मीर संदर्भात मोठा निर्णय केंद्र सरकार घेणार असल्याचे बोलले जातयं . त्या पार्श्वभुमीवर काश्मीरच्या भु राजनैतिक स्थानाविषयी मी तूमच्याशी संवाद साधणार आहे . कोणत्याही प्रदेशाच्या बाबतीत हे भू राजनैतिक स्थान अत्यंत महत्वाचे असते . सिंगापूर या देशाची अत्यंत कमी कालावधीत प्रचंड प्रगती झाली . पाकिस्तानला अमेरिका सर्वोतपरी मदत करते . याला त्या त्या प्रदेशाचे भू राजनैतिक स्थानच कारणीभूत आहे . या  भू राजनैतिक स्थानाचा अभ्यास मानवी भूगोल या भूगोलाच्या मुख्य शाखेतील राजकीय भूगोल या उपशाखेत करण्यात येतो .             तर आपले काश्मीर भू राजनैतिक स्थानामुळे  अग्नीकुंड  बनले आहे. ज्यांना काश्मीरचे भोगोलिक स्थान माहिती आहे . त्यांना हे माहिती आहे  की पाकव्याप्त काश्मीर सह संपूर्ण काश्मीरचा विचार करता जगातील सर्वात मोठे मानवास  सहज वापरण्यासारखे पाणी या प्रदेशात आहे . तसेच  येथून मध्य आशियातील तेल उत्पादक देश जे 1990 पर्यंत