पोस्ट्स

नोव्हेंबर ३, २०२२ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

परंपरा विनाखंडीत चालू

इमेज
         पाकिस्तानच्या आतापर्यंतच्या पंतप्रधानांच्या ते पदावरून मुक्त झाल्यावर काय झाले ? याचा आढावा घेतल्यास एकतर त्यांची हत्या झालेली दिसते किंवा त्यांना पाकिस्तान सोडून युनाटेड किंगडम अथवा आखाती देशात शरण घ्यावी लागल्याचा इतिहास आहे पाकिस्तानमधील कोणताच पंतप्रधान या चक्रातून सुटून पंतप्रधानाच्या पदावरून कार्यमुक्त झाल्यावर शांततेत निजधामाला गेलेला नाही . याच वर्षाच्या एप्रिल महिन्यात  अविश्वासाच्या प्रस्तावाद्वारे पदावरून दूर करण्यात आलेले इम्रान खान सुद्धा या चक्रातून सुटलेले नाहीत  गुरुवारी त्यांच्या हकिकी आझादी या आंदोलादरम्यान इम्रान खान यांच्यावर झालेल्या प्राणघातक हल्ल्याने हि गोष्ट पुन्हा एकदा सिद्ध झाली आहे  पाकिस्तानी पंजाबची राजधानी लाहोर पासून सुमारे दीड तासाच्या अंतरावर असेलेल्या पाकिस्तानी पंजाबच्या पूर्वेला असणाऱ्या वझीराबाद या शहरात अल्लावाला चौकातील पक्षाच्या तात्पुरत्या स्वरूपात स्थापन केलेल्या स्वागत कक्षाच्या जवळ इम्रान खान यांच्यावर हल्ला करण्यात आलेला असून त्यांना पायाला दुखापत झाली आहे . त्यानां उपचारासाठी लाहोर येथे हलवण्यात आले आहे . इम्रान खान यांच्याबरोबर अ