पोस्ट्स

जानेवारी १२, २०२३ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

अर्थव्यवथा गाळात राजकारण जोरात

इमेज
       अर्थव्यवथा गाळात राजकारण जोरात  या  एकाच वाक्यात पाकिस्तानातसध्या  घडणाऱ्या घडामोडींचे वर्णन करता येऊ शकते अर्थव्यवस्थेच्या  दुरावस्थेमुळे एकीकडे सर्वसामान्य जनता रोजच्या जगण्यासाठी अन्नास मोताद झाली असताना ,पाकिस्तानच्या गृहमंत्र्यासह विरोधी पक्ष असलेल्या पाकिस्तान तेहरीके ए इन्साफ या पक्षाचा अध्यक्ष उपाध्यक्ष यासह सर्व राजकारण्यांचे लक्ष मात्र पाकिस्तानी पंजाबच्या विधानसभेत रंगणाऱ्या राजकारणाकडे लागले आहे देशात असणाऱ्या चार राज्यांपैकी एका राज्यात दहशतवादी कृत्याने उच्चांक गाठला असताना .अर्थव्यवस्था अत्यंत डबघाईस आलेली असताना  त्यावर बोलायचे सोडून देशातील एका राज्याच्या विधानसभेबाबत होणाऱ्या राजकारणाबाबत देशाचा गृहमंत्री माध्यमांना प्रतिक्रिया देत सुटला आहे या प्रतिक्रियांमध्ये त्या राज्यात  सत्ताधिकारी मात्र केंद्रीय सत्तेचा विचार करता विरोधी पक्ष असलेल्या पक्षाने लोकशाहीचे  सर्व संकेत पायदळी तुडवल्याचा आरोप करत आहे आहे देशाच्या   प्रगतीत ६० ते ६५ % वाटा चालणाऱ्या राज्यामध्ये  मोठ्या प्रमाणत राजकीय अस्थिरता आहे आमच्या आमदारांना स्वतःच्या बाजूने वाळवण्यासाठी केंद्रीय सत्तेत अ