पोस्ट्स

जुलै ३०, २०२१ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

बातमीतील चीन( भाग15)

इमेज
        काही दिवसांच्या विश्रांतीनंतर चीनने पुन्हा आंतरराष्ट्रीय बातम्यांमध्ये झळकण्यास सुरवात झाली आहे. त्यातील 4 घडामोडी आपण काल बघीतल्या . आज बघूया तीन घडामोडी       तर मित्रांनो, चीनी बंदर प्राधिकरणाने भारतीय नागरीकत्व असणाऱ्या खलाश्यांवर बंधने घातली असल्याबाबतचे वृत्त, चीनने आँल्मपिकचे प्रक्षेपण करत आसताना अमेरीकेच्या कंपनीने केलेल्या खोडसाळपणावर घेतलेला आक्षेप,  आणि भारताच्या चीफ आँफ डिफेन्स स्टाफ  बिपिन रावल यांनी म्यानमारचा संदर्भात चीनबाबत केलेले विधान यामुळे चीन सध्या चर्चेच्या प्रथमस्थानी आला होता. आता बघूया या  घडामोडी विस्ताराने.  पहिल्यांदा चीन बंदर प्राधिकरणासंदर्भातील बघूया. तर जगभरात होणाऱ्या आंतरराष्ट्रीय व्यापारात जवळपास 95% व्यापार होतो तो समुद्रमार्गाने. यामालाची ने आण करणाऱ्या अनेक कंपन्या आहेत【त्यातील प्रसिद्ध कंपनी म्हणजे मर्स्क होय. जीचे कंटेनेर आपण रस्त्यावर अनेकदा बघतो,( मर्स्क ही कंपनी कोणतेही उत्पादन तयार करत नाही तर स्वतःच्या मालकीच्या कंटेनेर मधून इतरांच्या मालाची ने आण करते)] या कंपन्या समुद्रातून आपल्या जहाजाची ने आण करण्यासाठी खलांश्यांची नेमणूक करतात.