पोस्ट्स

एप्रिल ११, २०२१ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

गैरप्रकाराची किड ठेचायलाच हवी!

इमेज
कोणताही खेळ हा खरेतर खिलाडू वृत्तीने खेळायला हवा. मैदानी खेळांमध्ये संघाच्या खेळांडूसमोर सहभागी देशांचे राष्ट्रगीत वाजवत असताना समोर लहान मुले, मुली याचसाठी असतात. बालसुलभ, मनात कोणतीही वैर भावना खेळाडूंनी खेळताना जोपासू नये, ही या मागची भावना असते. बहुसंख्य खेळाडू याच भावनेने खेळतात.मात्र प्रत्येक गोष्टीला अपवाद असतातच . काही खेळाडू जिंकण्यासाठी गैरप्रकाराचा अवलंब देखील करतात. जगात प्रत्येकजण प्रत्येकाला सदा सर्वकाळ फसवू शकत नाही. या गैरप्रकार करणाऱ्या खेळाडूंचे बिंग कधीना कधी फुटतेच. असेच एका बुद्वीबळपटूचे बिंग इंडोनेशियात आँनलाइन स्पर्धै दरम्यान फुटले.आणि एकच गहजब झाला. बुद्धीबळ सारख्या बुद्धीच्या खेळात खेळात अधिकाधीक प्रगती होण्यासाठी आधूनिक तंत्रज्ञानाची मदत घेणे यात गैर काहीच नाही. काँम्प्युटर, अँप , पुस्तके, व्हिडीओ यांची मदत घेतल्यास आपले कच्चे दुवे सहजतेने समजतात, नव्या चाली समजतात.ज्याचा प्रत्यक्ष खेळात प्रतीस्पर्ध्यावर मात करायला उपयोग होतो. मी स्वतः युट्युबवर बुद्धीबळाविषयी अनेक व्हिडीओ बघतो..तसेच चेस डाँट काँम, लीचेस डाँट काँम सारख्या वेबसाइटवर आणि त्यांचा अँपवर तसेच चेसवि

नाशिकमध्ये काय चाललंय!

इमेज
नाशिक. भारतातील सर्वाधिक नागरीकरण झालेल्या महाराष्ट्रातील चौथ्या क्रमांकाचे मोठे शहर . समस्त भारताला ज्या शहरातून पासपोर्ट, स्टँम्प पेपराचा  दिले  जातात ते शहर . द्राक्ष निर्यातीतून मोठ्या प्रमाणात परकीय चलन मिळते ते शहर म्हणजे नाशिक .  भारताच्या हवाइ दलाला मिग विमाने ज्या शहरातून तयार करुन पुरवली जातात ते शहर म्हणजे नाशिक. आपल्या धार्मिक कार्यामुळे जगभरात ओळखले जाणारे शहर म्हणजे नाशिक . आख्या भारताला स्कापिर्यो ज्या शहरात तयार होवून पुरवले जातात ते शहर म्हणजे नाशिक .   आजमितीस मात्र संपुर्ण शहर मरणासंपन्न झाले आहे. कोरोना रुग्णांच्या वाढत्या संख्येने अन्य वेळी गर्दीने ओथंबून वाहणाऱ्या शहरात स्मशान शांतता पसरली आहे. आहे ती फक्त भांबावलेली आणि आपल्या आतेष्ठांवर कुठे कोरोनाचे उपचार होवू शकतात का? यासाठी एका रुग्णालयातून दूसऱ्या रुग्णालयात जाणारी जनता.या ठिकाणी खरेतर ज्यांनी शहराची जवाबदारी घेयला हवे असे आमदार खासदार कुठेच दिसत नाही. फक्त पालकमंत्री थोडेसे चित्रात दिसत आहे, ते फक्त बैठकांमध्ये .मात्र बैठकांमध्ये घेतलेल्या निर्णयामुळे परीस्थिती सुधारते आहे,असे म्हणावे तर उत्तर नकारात्मक ये