पोस्ट्स

ऑक्टोबर १०, २०२२ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

पाकिस्तान राजकीय अस्थिरतेच्या कडेलोटावर

इमेज
  पाकिस्तान राजकीय अस्थिरतेच्या कडेलोटावर , असल्याचे तेथून येणाया बातम्यांमधून  स्पष्ट होत आहे . इम्रान खान यांचे आंदोलन चिरडण्याची पूर्ण तयारी केल्याचे दिसून येत आहे आजमितीस पाकिस्तानची राजधानी इस्लामाबादमध्ये  ठिकठिकाणी रस्त्यावर कंटनेरच्या भिंती उभ्या केल्या आहेत रस्ते खणून त्याठिकाणी मोठमोठे खिळे रोखण्याचे काम सुरु आहे . पाकिस्तानच्या केंद्रीय सरकारतर्फे इस्लामाबाद पोलीस आणि सिंध प्रांतीय पोलिसांच्या मदतीने मोठ्या प्रमाणत सुरक्षादले तैनतीचे नियोजन सुरु आहे . प्रसंगी आंदोलनकांवर ड्रोनच्या मदतीने अश्रुधुराच्या नळकांड्या फोडण्याच्या दृष्टीने प्रशासनाचे नियोजन सुरु आहे या प्रकारच्या बातम्या आंतराष्ट्रीय माध्यमात येत आहेत इस्लामाबाद शहारत येणारे सर्व रस्ते बंद करण्याचे नियोजन सुरु आहे            इम्रान खान यांच्या राजकीय प्रचार सभांना मोठ्या प्रमाणत पाठिंबा मिळत आहे समस्त पाकिस्तानी जनता इम्रान खान केव्हा आंदोलनाची हाक देतात याकडे लक्ष देत आहे इम्रान खान यांनी माझे फोन सुद्धा रेकॉर्ड होत असल्याने आंदोलनाचे नियोजन करतांना काहीशी अडचण येत आहे मात्र आंदोलनाचे अत्यंत सूक्ष्म पातळीवर नियोजन