पोस्ट्स

नोव्हेंबर २५, २०१८ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

सुयोग्य व्यक्तीला मतदान, भष्ट्राचाराला मुक्ती

इमेज
माझ्या या आधीच्या दोन ब्लॉग पोस्ट फेसबुकवर शेअर केल्यावर  फेसबुकवर आलेल्या प्रतिक्रियांमध्ये लोकप्रतिनिधींवर प्रचंड प्रमाणांत राग व्यक्त करण्यात आला होता . ते प्रचंड भष्ट्राचारी असल्याचा सर्वसाधारण सूर होता . या प्रतिक्रियांबाबबत विचार करताना " क्रियेवीण वाचाळता व्यर्थ आहे " या वचनाला जागून काय करता येईल याबाबत विचार करताना मला सुचलेलले उपाय तुम्हाला सांगण्यासाठी आजचे लेखन         आजची निवडणूक प्रचंड प्रमाणात खर्चिक झाली आहे. मात्र सध्याच्या कायदान्वये मान्य असणारा  खर्च अत्यंत तुटपुंजा आहे ,  त्यामुळे लोकप्रतीनिधीद्वारे मान्य असणाऱ्या खर्चापेक्षा जो अतिरिक्त खर्च केला जातो त्यातून काळ्या पैशाची निर्मिती होते. हा काळा  पैसे निर्माण करण्यासाठी लोकप्रतिनिधींकडून अनुचित मार्गाचा अवलंब केला जातो , ज्यास आपण भष्ट्राचार असे म्हणतो . माझ्यामते हे दुष्ट चक्र भेदायचा असल्यास कायदान्वये मान्य  असणारा खर्च  सध्याचा तुलनेत वाढवण्यात यावा . उमेदवारांना जास्त पैसे का खर्च करावे  लागतात ,  याचा विचार केल्यास आपणास सहज लक्षात येते की निवडणुकीच्या काळात गरीब लोकांना  होणारे अर्थसाह्य तसेच