पोस्ट्स

सप्टेंबर ३०, २०२० पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

बिगुल 46व्या अमेरीकेच्या अध्यक्षाचे (भाग 6)

इमेज
              गेल्या वर्षभरापासून सुरु असलेल्या 46 व्या अमेरीकेच्या अध्यक्षपदाच्या निवडणूकीची रणधुमाळी आता आंतिम टप्यात आली आहे .(ज्याची मी गेल्या वर्षभरात पाच पोस्टमधून वेळोवेळी दखल घेतली आहे . ज्यांना त्या वाचायचा असतील, अश्यांसाठी मी या लेखाच्या खाली त्यांचा लिंक पेस्ट केल्या आहेत. जिज्ञांसू त्या बघू शकतात)  सुमारे  एक महिना शिल्लक राहिलेल्या या निवडणूकीच्या रणधुमाळीतील महत्त्वाचा टप्पा असलेल्या Presidential Debate आता सुरु झाल्या आहेत . निवडणूकीतील उपाध्यक्षपदाचे दावेदार असलेल्या व्यक्तींची टिव्ही चर्चा झाल्यावर हा मजकूर लिहित असताना अध्यक्षपदाचे डोमोक्रेक्टीक पक्षाचे उमेदवार असणाऱ्या जाँन बायडन आणि विद्यमान अध्यक्ष तसेच रिपब्लिकन पक्षाचे उमेदवार डोनाल्ड ट्रम्प यांच्यात टिव्हीवरील चर्चा आज भारतीय प्रमाणवेळेनुसार 30 सप्टेंबरला सकाळी साडेसहा ते आठपर्यत (अमेरिकेच्या प्रमाणवेळेनुसार 29सप्टेंबर रात्री 09 .:00ET) झाली . या चर्चेचे सुत्रसंचालन  Fox या वृत्तवाहिनीचे वृत्तनिवेदक   यांनी केले . या वर्षी नोव्हेंबर महिन्यात 3 तारखेला होणाऱ्या या निवडणूकीच्या आधी  तीनवेळेस दोन्ही प्रमुख पक्षाच