पोस्ट्स

जून ८, २०२२ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

बुद्धिबळप्रेमींना आनंद देणारे विश्वनाथन आनंद

इमेज
      आपल्यला  असणाऱ्या प्रत्येकाच्या नावाला काहीतरी अर्थ असतो .जसे माझ्या अजिंक्य नावाचा अर्थ ज्याला कोणी जिंकू शकत नाही असा होतो . आता प्रत्येकजण त्याचे नाव सार्थ करतो का ? हा एका मोठ्या संशोधनाचा विषय ठरेल .असे संशोधन या पूर्वी झाले आहे का ? असल्यास त्याचा निष्कर्ष काय होता ? यापुढे भविष्यात असे कोणते संशोधन होईल का ? याबाबतही मी काही सांगू शकत नाही मात्र मी एक गोष्ट १०० % खात्री घेऊन सांगू शकतो ती म्हणजे आपल्या भारतातील एक व्यक्ती मात्र आपल्या नावाला जागली आहे आपले नाव निवळ एक नाव नसून ते नाव त्यांनी सिद्ध केले आहे त्या व्यक्तीचे नाव आहे विश्वनाथन आनंद           भारतातील पहिले ग्रँडमास्टर, तसेच  ५ वेळा विश्वविजेते असणाऱ्या आणि आजमितीस भारतातील सर्वाधिक फिडे गुणांकन असणाऱ्या विश्वनाथन आनंद यांचे सध्या सुरु असलेल्या नॊर्वे येथील बुद्धिबळ स्पर्धेतील कामगिरी बघता बुद्धिबळप्रेमींना आपल्या खेळाद्वारे आनंद देणारे बुद्धिबळपटू म्हणजे  विश्वनाथन आनंद असेच म्हणावे लागेल ८ जूनपर्यंत झालेल्या ७ डावाचा विचार करता विश्वनाथन आनंद यांचे १३ गुण झाले झाले आहेत.  ते या स्पर्धेत दुसऱ्या क्रमांकावर आहेत