पोस्ट्स

नोव्हेंबर २३, २०२० पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

असे बनले संविधान (भाग 4)

इमेज
           आपले संविधान जगातील उत्कृष्ट असणाऱ्या काही संविधानापैकी एक आहे. आपले संविधान अमेरीका या देशासारखे अत्यंत ताठर नाही. किंवा युनाटेड किंंग्डमसारखे सहज बदलता येण्यासारखे  नाही. आपल्या संविधानात दुरुस्तीचे तीन प्रकार कलम 368 मध्ये सांगितले आहेच. हे आपणास माहिती असेलच .  हा मजकूर लिहण्यापर्यत संविधानात 104 वेळा घटनादुरुस्ती झाली आहे. त्यातील 42वी, 44 वी आणि 73 वी, 74 वी घटनादुरुस्ती ,69वी घटनादुरुस्ती, 97वी, 52वी, 86 वी, 101,आणि 103वी घटनादुरुस्त्या  विशेष  महत्त्वाच्या आहे.  42वी घटनादुरुस्ती ही आणिबाणीच्या काळात झालेली घटनादुरूस्ती आहे, यामध्ये घटनेत झालेले बदल हे काहीसे वादगस्त असून या घटनादुरुस्तीत खुप मोठ्या प्रमाणात बदल करण्यात आल्यामुळे ही घटनादूरुस्ती  या घटनादुरुस्तीला मिनी संविधान म्हणतात..  या घटनादुरुस्तीमुळे सविधानाच्या उद्देशपत्रीकेत (प्रियंबल मध्ये) काही शद्बांची भर घालण्यात आली. आज पर्यत हे शद्ब अनेकदा वादगस्त ठरले आहेत, मात्र हे शद्ब काढून टाकण्याची घटनादुरुस्ती झालेली नाही. 44वी घटनादुरूस्ती 42व्या घटनादुरुस्तीमुळे झालेले बदल पुर्वपदावर आणणारी घटना दुरुस्ती म्हणू