पोस्ट्स

नोव्हेंबर २८, २०२० पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

तळगाळातील व्यक्तिंच्या व्यथा मांडणारे महात्मा फुले.

इमेज
  आजपासून सुमारे 140 वर्षापूर्वीची गोष्ट आहे . भारतातील सर्वसामान्य , तळागाळातील व्यक्तींचे जीवनमान उंचावण्यासाठी काय करता येईल? यावर चर्चा करण्यासाठी समाजातील उच्च पदस्थ व्यक्ती , इंग्रजी वेशभुषेत एकत्र जमले आहेत. या चर्चासत्रात जमलेल्या बहुसंख्य व्यक्तिंचा सर्वसामान्य जनतेशी फारसा संपर्क नव्हता. अश्या व्यक्तींच्या समुहात एक व्यक्ती येते. व्यक्तीचा पेहराव सर्वसामान्य जनतेसारखाच असतो. सदर व्यक्ती मला माझे म्हणणे मांडायचे आहे, असा आग्रह आयोजकांकडे करते. ही अशिक्षीत गावढंळ वाटणारी व्यक्ती या उच्च पदस्थांच्या सभेत काय बोलणार ? म्हणून प्रश्न उपस्थित केले जातात. मात्र एक औपचारीकता म्हणून त्या व्यक्तिला बोलण्याची संधी दिली जाते. मात्र त्या सभेत उपस्थित असणाऱ्या उच्च पदस्थ व्यक्तींना लाजवेल , अश्या अस्सलिखित इंग्रजी भाषेत ती व्यक्ती शेतकऱ्यांचे मुळातील दूःख जनतेसमोर मांडते. या चर्चासत्राला उच्चपदस्थांचा विरंगुळा असे संबोधते. त्या व्यक्तींचे नाव असते. महात्मा ज्योतीबा फुले. 28 नोव्हेंबर ही त्यांची पुण्यतिथी त्या निमित्ताने सर्वप्रथम त्यांना विनम्र आदरांजली .                   समाजातील तळागाळात