पोस्ट्स

जून १४, २०२१ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

जाने क्यू .....

इमेज
   कालचीच गोष्ट आहे. सहज विरंगुळा म्हणून युट्युब वर सर्फिंग करत असताना एक गाणे समोर आले. प्रीती झिंटा आणि अमीर खान यांच्यावर चित्रीत झालेले. बाँलीवूडच्या आतापर्यतचा इतिहासातील सर्वोत्तम गाण्यापैकी एक असणारे हे गाणे  प्रेम का करतात ? या अतिगहन प्रश्नाचे उत्तर शोधणारे.      गाण्याचा सुरवातीला नायक प्रेमामध्ये काय काय तडजोडी कराव्या लागतात? प्रेमामुळे कोणकोणत्या समस्यांना सामोरे जावे लागते? याचा पाढा नायीकेसमोर वाचतो. नायक प्रेमाच्या अडचणी सांगत असताना नायिका तिच्या कामात व्यस्त असते. नायकाकडे सातत्याने दुर्लक्ष करते. सरतेशेवटी नायकाच्या प्रश्नाला सविस्तर उत्तर देते, आणि गाणे संपते. एक छोटीसी संकल्पना कस्या पद्धतीने खुलवता येते याचे उत्कट उदाहरण म्हणजे हे गाणे, दिल चाहता है या.चित्रपटातील आहे. मुळच्या चित्रपटाविषयी काहींच्या नकारात्मक भावना ,  अभिप्राय असू शकतील , मात्र या गाण्याविषयी नकारात्मक भावना ठेवणारा खचितच एखाद दुसरा असेल.   जावेद अख्तर यांची रचना असलेल्या या  गाण्याला  उदीत नारायण ,अलका याग्निक यांनी स्वरसाथ दिली आहे. तर संगीत रचना शंकर एहसान राँय यांची आहे. दिल चाहता हे या चित्र