पोस्ट्स

मार्च १९, २०१६ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

चांगले जल चांगली नोकरी

इमेज
मार्च महिना सुरु झाल्यावर ज्या अनेक गोष्टीची आठवण होते . त्यातील महत्वाची गोष्ट म्हणजे २२ मार्चचा जागतिक पाणी दिवस . 1992 मध्ये पाणी प्रश्नावर  आयोजित केलेल्या युनो च्या परिषदेत ठरल्या प्रमाणे 1993  पासून 22 मार्च जागतिक पाणी दिवस म्हणून साजरा करण्यात येतो . पृथ्वीवर 71 % असणाऱ्या पाणी या नैसर्गिक साधनसंपत्तीकडे  मानवाचे दुर्लक्ष होते परिणामी त्याची प्रचंड प्रमाणात नासाडी होते . जरी पृथ्वीवर 71% पाणी असले तरी पिण्यायोग्य पाणी फारच कमी आहे . बहुतांशी पाणी समुद्रात आहे जे पिण्यायोग्य नाही त्यात अनेक क्षार मिसळेले आहेत. पिण्यायोग्य असणाऱ्या पाण्यातील बहुतांशी पाणी दोन्ही ध्रुव आणि हिमालय आदि पर्वतात गोठलेले आहे . जागतिक हवामानाचा विचार करता ते पाणी वापरणे फारशे योग्य नाही . परिणामी उपलब्ध पाण्यापैकी जेमतेम 3 ते ४ टक्के पाणी प्रत्यक्षात वापरता येते . आणि मानव पाणी  फारच गैर प्रकारे वापरतो . ते असेच चालू राहिले तर भविष्यात मानवास पाणी वापरण्यास राहणारच नाही . या कडे लक्ष वेध घेण्यासाठी या दिनाचे आयोजन करण्यात येते .आपल्या भारतीय तत्वज्ञानात पाण्याला पंच महाभूताची उपमा दिली आहेच . या पंचमह