पोस्ट्स

नोव्हेंबर ७, २०१९ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

बिगुल ४६ व्या अमेरिकी राष्ट्रपतींचे (भाग तिसरा )

इमेज
                                           आपणास  महाराष्ट्रात मुख्यमंत्रीपदाबाबत विविध बातम्या पारंपरिक  प्रसार माध्यमातून समजत असताना  भारतासारखीच प्रगल्भ लोकशाही असणाऱ्या युनाटेड स्टेट्स ऑफ अमेरिका या देशातील अध्यक्षपदाच्या बाबतीत नाट्यमय घडामोडी घडत आहे . या घडामोडी सध्याचे राष्ट्राध्यक्ष असणाऱ्या  डोनाल्ड ट्रम्प यांच्या बाबत आणि पुढील राष्ट्राध्यक्षांबाबत देखील घडत आहे . मी या लेखमालेच्या पहिल्या भागातच सांगितल्याप्रमाणे मी डोनाल्ड ट्रम्प यांच्याविषयी काहीही भाष्य करणार नाही . माझ्या आधीच्या लेखांच्या लिंक या लेखाच्या खाली आपणास मिळतील           या लेखमालेच्या दुसऱ्या भागात युनाटेड स्टेट्स ऑफ  अमेरिका या देशातील अध्यक्षपदाच्या निवडणुकीच्या चार टप्यापैकी पहिल्या दोन टप्यात काय काय घडते याची माहिती घेतली आता या  भागात तिसऱ्या आणि चोथ्या टप्यात काय घडते याची माहिती घेउया                   पहिल्या दोन टप्यात  पक्षातर्फे अध्यक्षपदाच्या उमेदवार ठरल्यानंतर ही  लढाई एका वेगळ्या उंचीवर पोहाचतें .  पक्षाचे उमेदवार एकमेकांच्या विरोधात प्रचार करताना आपल्या भारतासारख्याच देशभर सभा घेऊन द