पोस्ट्स

फेब्रुवारी २३, २०२१ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

भारत माँरीसियस व्यापार नव्या वळणावर !

इमेज
        आपले परराष्ट्रमंत्री मंत्री  एस जयशंकर यांनी नूकताच आफ्रिका खंडातील माँरीशियस या देशाबरोबर व्यापारी करार केला. आफ्रिका खंडात वाढत जाणाऱ्या चीनच्या वर्चस्व्याला शह देण्यासाठी ही रणनिती उपयोगी पडू शकते, असे परराष्ट्र धोरणाविषयीचे तज्ज्ञांचे मत आहे.या करारानुसार माँरीसियस आणि भारत या दोन देशांमध्ये काही वस्तूंवर करमुक्त आयात - निर्यात होवू शकते.माँरीसियस हा देश जगभरात ज्या गोष्टींची निर्यात करतो, त्यातील सुमारे 75% वस्तू यात अंतर्भूत करण्यात आल्या आहेत. ज्यांची एकुण संख्या 310पेक्षा अधिक आहे. या वस्तूंमध्ये सुकवलेले मासे, फळे, भाज्या, काही यंत्रसामुग्री या वस्तूंचा समावेश करता येईल.भारताचा  विचार करता भारताकडून माँरीसियसला आयटी विषयक, तंत्रज्ञानविषयक, अवकाश संशोधकविषयक  सेवा विनाअडथळा पुरवता येवू शकतील.   भारताने या आधी या प्रकारचे करार आशियान संघटनेतील देश, युरोपीय युनियन, जपान आदी देशांबरोबर केला आहे. मात्र आफ्रिका खंडातील देशांबरोबरचा हा  या प्रकारचा पहिलाच करार आहे. चीनने याच प्रकारचा करार माँरीसियस बरोबर जानेवारी 2021 रोजी केला आहे. या करारामुळे भारतीय कंपन्यांना माँरीसियस बर