पोस्ट्स

डिसेंबर ७, २०१९ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

मला भावलेले सुरत . (भाग 1)

इमेज
                  केल्याने देशांतर  शहाणपण येते असे आपल्याकडे म्हणतात. . याच उक्तीला जागत  मी नुकताच  नाशिक- सुरत -भिवंडी आणि परत नाशिक  प्रवास केला त्याची ही कहाणी .                               माझा प्रवास सुरु झाला गुजरात राज्य परिवहन महामंडळाच्या पुणे सुरत बसने[ अर्थात बस जरी पुण्याहून सुरतला जाणारी असली तरी मी त्यात स्थानापन्न झालो ते नाशिकला] जी नाशिकहून पारंपरिक मार्गाने अर्थात दिंडोरी सापुतारा मार्गाने .  मी रविवार सुरत दर्शनासाठी निवडल्याने मला सुरतच्या  सुप्रसिद्ध हिरे आणि कापड बाजाराला दर्शनाला मुकावे लागले. असो जे होते ते चांगल्यासाठीच                                                        सुरतची पर्यस्थान स्थळे माहित नसल्याने मी शहर फिरण्याचा द्रूष्टीने शहर बस वाहतुकीचा मार्ग निवडला आणि मला धक्क्यावर धक्के बसायला सुरवात झाली , बसचे कंडक्टर आणि डायव्हर मराठी होते  त्यांच्याशी बोलताना समजले कि सुरत मध्य 50% गुजराती आहेत तर50% इतर आहेत इतरांपैकी सुमारे60% मराठी लोक आहेत . नंतर मला अनेक मराठी लोक भेटत गेले, मला भेटलेली बहुतांशी मराठी लोक कष्टकरी समजले जाणारे व्यवसाय क