पोस्ट्स

मार्च १५, २०२२ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

पाकिस्तानची वाटचाल कुठे चाललिये

इमेज
          आपल्या भारताच्या शेजारी असलेल्या  पाकिस्तानची वाटचाल कुठे  चाललिये  अशा प्रश्न उपस्थित व्हावा अश्या घडामोडी सध्या पाकिस्तानात घडत आहेत . पाकिस्तानमध्ये मार्चच्या दुसऱ्या आठवड्यात होणाऱ्या ऑर्गनायझेशन ऑफ इस्लामिक कंट्री च्या अधिवेशनानंतर पाकिस्तानी पंतप्रधान इम्रान खान यांच्या विरोधात आंदोलन करण्याचा निणर्य तेथील विरोधी पक्षांनी घेतला आहे जागतिक परिषदेसमोर आपली  वैयक्तिक भांडणे नको परिषद  झाल्यावर आपण पुन्हा भांडू अशा निर्णय त्यांनी घेतला आहे . त्यामुळे पाकिस्तानच्या पंतप्रधानाची गच्छन्ति एका आठवड्याच्या काळासाठी का होईना पुढे गेली आहे जर हि  गच्छन्ति  झाली तर अशी  गच्छन्ति होणारे पाकिस्तानचे पहिले पंतप्रधान म्हणून त्यांची नोंद होईल पाकिस्तानच्या संसदीय लोकशाहीच्या इतिहासात याच्या आधी तीन वेळेस पाकिस्तानच्या पंतप्रधानांवर अविश्वास प्रस्ताव दाखल करण्यात आला आहे मात्र दरवेळी तो फेटाळला गेल्याने तेथील पंतप्रधानाची खुर्ची वाचली आहे          इम्रान खानच्या सरकारला पाठिंबा देणाऱ्या पाकिस्तानी मुस्लिम लीगच्या कायदे गटाच्या अध्यक्षाबरोबर चीनच्या पाकिस्तानातील दुतावासातील दुसऱ्या क्रम

भूगर्भातील पाणी अदृश्यातून दृश्यतेकडे

इमेज
     मार्च महिना सुरु झाल्यावर ज्या अनेक गोष्टीची आठवण होते . त्यातील महत्वाची गोष्ट म्हणजे २२ मार्चचा जागतिक पाणी दिवस . १९९२  मध्ये पाणी प्रश्नावर  आयोजित केलेल्या युनो च्या परिषदेत ठरल्या प्रमाणे १९९३  पासून २२ मार्च जागतिक पाणी दिवस म्हणून साजरा करण्यात येतो .                  पृथ्वीवर 71 % असणाऱ्या पाणी या नैसर्गिक साधनसंपत्तीकडे  मानवाचे दुर्लक्ष होते परिणामी त्याची प्रचंड प्रमाणात नासाडी होते . जरी पृथ्वीवर ७१ % पाणी असले तरी पिण्यायोग्य पाणी फारच कमी आहे . बहुतांशी पाणी समुद्रात आहे जे पिण्यायोग्य नाही त्यात अनेक क्षार मिसळेले आहेत. पिण्यायोग्य असणाऱ्या पाण्यातील बहुतांशी पाणी दोन्ही ध्रुव आणि हिमालय आदि पर्वतात गोठलेले आहे . जागतिक हवामानाचा विचार करता ते पाणी वापरणे फारशे योग्य नाही . परिणामी उपलब्ध पाण्यापैकी जेमतेम 3 ते ४ टक्के पाणी प्रत्यक्षात वापरता येते . आणि मानव पाणी  फारच गैर प्रकारे वापरतो . ते असेच चालू राहिले तर भविष्यात मानवास पाणी वापरण्यास  राहणारच नाही . या कडे लक्ष वेध घेण्यासाठी या दिनाचे आयोजन करण्यात येते .आपल्या भारतीय तत्वज्ञानात पाण्याला पंच महाभूताची उप