पोस्ट्स

डिसेंबर २७, २०२१ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

सिंहावलोकन २०२१ भारत आणि जग

इमेज
       सरते वर्ष २०२१ भारतासाठी खूपच महत्त्वाचे ठरले या वर्षी मॉरिशस , युनाटेड किंग्डम , रशिया ऑस्ट्रेलिया आणि अमेरिका यांच्याबाबत भारताला अनुकूल अश्या अनेक घडामोडी घडल्या त्यामुळे  या सरत्या वर्षात भारताचे  पररराष्ट्र धोरण खूपच यशस्वी ठरले असे म्हटल्यास वावगे ठरू नये अशी स्थिती निर्माण झाले आहे              वर्षाच्या सुरवातीलाच    आपले परराष्ट्रमंत्री मंत्री  एस जयशंकर यांनी  आफ्रिका खंडातील माँरीशियस या देशाबरोबर व्यापारी करार केला या करारानुसार माँरीसियस आणि भारत या दोन देशांमध्ये काही वस्तूंवर करमुक्त आयात - निर्यात होवू शकते.माँरीसियस हा देश जगभरात ज्या गोष्टींची निर्यात करतो, त्यातील सुमारे 75% वस्तू यात अंतर्भूत करण्यात आल्या आहेत. ज्यांची एकुण संख्या 310पेक्षा अधिक आहे. या वस्तूंमध्ये सुकवलेले मासे, फळे, भाज्या, काही यंत्रसामुग्री या वस्तूंचा समावेश करता येईल.भारताचा विचार करता भारताकडून माँरीसियसला आयटी विषयक, तंत्रज्ञानविषयक, अवकाश संशोधकविषयक  सेवा विनाअडथळा पुरवता येवू शकतील.भारताने या आधी या प्रकारचे करार आशियान संघटनेतील देश, युरोपीय युनियन, जपान आदी देशांबरोबर केला आहे.

सिंहावलोकन २०२१, भारत आणि जागतिक परिषदा,

इमेज
           या वर्षी २०२१ साली भारताने अनेक जागतिक परिषदांमध्ये महत्वाची भूमिका बजावली . ज्यामध्ये  हार्ट ऑफ आशिया , जी ७ , शांघाय कॉपरेशन ऑर्गनायझेशन , अशियन बिमस्टेसक , कॉप २६ , अश्या अनेक  परिषदनाचा समावेश होतो या परिषदनमध्ये इतर वर्षांप्रमाणंच याही वर्षी भारताने या परिषदनमध्ये    महत्त्वाची भूमिका मांडली जी भारताच्या वसुधैव कुटुबकम या तत्वाशी मेळ खाणारी होती या परिषद ऑनलाईन आणि ऑफलाईन दोन्ही पद्धतीने झाल्या            काझकिस्तान या देशातर्फे एस सी ओ च्या सरकार प्रमुखांच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते    कझाकिस्तानचे नूर सुलतान हे या बैठकीचे अध्यक्ष होते    या बैठकीचे हे २०वे वर्ष होते . ज्या बैठकीत भारताचे प्रतिनिधित्व  भारताचे परराष्ट्र मंत्री एस जयशंकरयांनी केले  गातील सर्वात मोठी पादेशिक संघटना असलेल्या शांघाय कॉ ऑपरेशन या संघटनेची स्थापना २००१ साली आहे भारत या संघटनेच्या निरीक्षक म्हणून २००५ पासून काम करत होता तर सन २०१७ पासून या संघटनेच्या भारत पाकिस्तानसह पूर्णवेळ सदस्य झाला     कोरोनाच्या जगातिक साथीनंतर जगाची रचना प्रचंड प्रमाणात बदलली आहे कोरोना साथीची माहिती जगाला देण्

सिंहावलोकन २०२१ भारत आणि भारताचे शेजारी

इमेज
            सन २०२१ हे वर्ष आणि भारत  भारताच्या शेजारील देश यांच्या विचार करता अत्यंत महत्त्वाचे ठरले यावर्षी भारताच्या शेजारील देशामध्ये अनेक घडामोडी घडल्या ईशान्य भारताबरोबर मुख भूमीचा अधिक सक्षम संपर्क स्थापित व्हाया म्हणून बांगलादेश आणि म्यानमार बरोबर झालेले करार ,नवरात्रीदरम्यान बांगलादेशातील हिंदूंवर झालेले हल्ले . मालदीव या देशात झालेले भारतविरोधी आंदोलने , अफगाणिस्तानातील तालिबानचा उदय , चीन बाबतच्या संबंधात वाढलेली कटुता , भूतानमध्ये त्यांच्या अंतर्गत भ्रष्टाचाराच्या प्रकरणात उघड झालेला भारतीय नागरिकाचा समावेश,  नेपाळच्या राजकारणी लोकांची भारत विरोधी वक्तव्ये आणि नेपाळचा विकासाबाबत भारतने उचलली पाऊले  ,श्रीलंकेमध्ये भारतीय प्रकल्पना झालेला विरोध आणि पाकिस्तानशी असणारे तणावाचे वातवरण या बाबींचा अभ्यास आपणास  २०२१ साली भारत आणि त्याच्या शेजारील देशांमाबरोबरचे संबंध बघताना करावा लागेल .      नेपाळचे हंगामी पंतप्रधान के पी ओली शर्मा यांनी २० जून २०२१  मध्ये त्याच्या घरी आयोजित केलेल्या एका सार्वजनिक कार्यक्रमात भारत हा योगशात्राचा जनक नाही मुळात ब्रिटिशांच्या येण्या अगोदर भारत नाव