पोस्ट्स

जून ३, २०२० पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

मार्टिन ल्युथर किंग परत या

इमेज
                       सध्या जगात करोना व्यतिरीक्त काय चालू आहे? ,  याचा आढावा घेतल्यास अमेरीका या देशात हिंसक रुपात सुरु असणाऱ्या वर्णसंघर्षाची अग्रक्रमाने नोंद घ्यावीच लागेल. एका कृष्णवर्णीय व्यक्तीला 20डाँलरची बनावट नोट दुकानदाराला देण्याचा आरोपावरुन श्वेतवर्णीय पोलीसांनी अटक करुन,  केलेल्या माराहणीत संबधीत व्यक्तीचा मृत्यू झाल्यामुळे तेथील जनमत प्रक्षुब्ध होउन हिंसाचार  उसळला आहे .या हिंसाचारामुळे तेथील 20 राज्यातील 40 शहरामध्ये संचारबंदी लावण्याची वेळ आली आहे                                   हा तोच अमेरीका देश आहे, ज्या देशामध्ये विसाव्या शतकाच्या साठाव्या दशकाच्या अखेरीस आणि सतराव्या दशकाचा प्रारंभीच्या वर्षात अमेरीकन गांधी, असी ओळख असणाऱ्या मार्टिन ल्युथर किंग यांनी वर्णभेदाचा विरोधात शांततेच्या मार्गाने लढा उभारला होता .सध्याच्या अमेरीकेतील हिंसाचार बघून त्याची प्रकर्शाने आठवण येते .त्याकाळी सार्वजनिक बसवाहतूकीत श्वेतवर्णीय आणि कृष्णवर्णीय अमेरिकीन व्यक्तींची आसनव्यवस्था वेगवेगळी असे, एकदा एका श्वेतवर्णीय व्यक्तीला बसमध्ये जागा न दिल्याबदल एका कृष्णवर्णीय महिलेला बसमधून उतर