पोस्ट्स

फेब्रुवारी २२, २०२३ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

नाशिककरांसाठी सुवर्णक्षराने नोंदवायचा क्षण 

इमेज
    मंगळवार २१ फेरबुवारीची सायंकाळ नाशिकरांसाठी सुवर्णाक्षराने नोंदवून ठेवावी अशीच ठरली , कारण नाशिकचे भूमिपुत्र जागतिक क्रमवारीत १९ व्या स्थानी आणि भारतीय क्रमवारीत दुसऱ्या स्थानी असणारे सुपर ग्रँडमास्टर विदित गुजराथी यांनी विद्यमान विश्वविजेतेपदास पाचवेळा विश्वविजेते असणाऱ्या मॅग्नस कार्लसन याना पराभवावाचे पाणी पाजण्याचा भीम पराक्रम घटना यावेळी घडली . प्रो चेस टूर्नामेंट या १६ संघाच्या सामावेश असणाऱ्या बुद्धिबळ स्पर्धेदरम्यान इंडिया योगीज्   या संघाकडून खेळताना त्यांनी हा पराक्रम केला  मॅग्नस कार्लसन  Canada Chessbrahs या संघाकडून खेळत होते  काळ्या मोहऱ्या घेऊन विदित गुजराथी यांनी हे यश मिळवले आहे बुद्धिबळ खेळामध्ये पांढरे मोहरे घेऊन खेळणारा खेळाडू प्रथम चाल करत असल्याने खेळामध्ये प्रतिस्पर्ध्यावर आक्रमण करणे पांढऱ्यास काहीसे सोपे असते काळे मोहरे घेऊन खेळणाऱ्या खेळाडूला पांढऱ्याचे आक्रमण परतवून पांढऱ्यावर प्रति आक्रमण करावे लागते ही बाब लक्षात घेता विदित गुजराथी यांनी मिळवलेल्या विजयाचे महत्व लक्षात येते     या डावदरम्यान  दोनदा मॅग्नस कार्लसन यांना  विदित यांच्यावर विजय मिळवायच्या स