पोस्ट्स

जुलै ६, २०२२ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

अस्वस्थ भूकवच आणि आपण

इमेज
          सध्या आपल्या महाराष्ट्राच्या दक्षिण भागात पावसाने धुमाकूळ घातला असताना   आपल्या समस्त भारतीयांना काळजी वाटावी अशी घडामोड अंदमान निकोबार बेटांच्या परिसरात घडत आहे . सध्या या घडामोडीचे स्वरूप काहीसे छोटे आहे मात्र या घडमोडणीने सुरवातीचे छोटे  स्वरूप सोडून मोठे स्वरूप धारण केल्यास आपल्या भारतासह बांगलादेश म्यानमार या क्षेत्रात मोठ्या प्रमणात प्राणहानी करण्याची याची ताकद आहे हे संकट आहे भूकंपाचे ६ जुलै या एकाच दिवसात २४ तासात या भागाला तब्बल २२ हो २२ भूकंपाचे धक्के बसले रिक्टर स्केलवर या भूकंपाची तीव्रता ३ पूर्णांक ८ शतांश ते ५ या दरम्यान होती या रिक्टर स्केलचे भूकंप छोटे आणि मध्यम स्वरूपाच्या दरम्यानचे समजले जातात भूकंपाची तीव्रता कमी आहे म्हणून या भूकंपाकडे दुर्लक्ष करणे योग्य ठरणारे नाही २४ तासात २२ म्हणजे जवळपास प्रत्येक तासाला एक भूकंप इतके हे स्वरूप भयानक आहे पृथ्वीच्या अंतर्गत भागात मोठ्या प्रमाणत हालचाली सुरु झाल्याचे ते निर्दशक आहे . या खेरीज आसाम राज्यात ७ जुलै रोजी अत्यंत छोटा म्हणजे २ पूर्णांक ५ शतांश रिक्टर स्केलचा भूकंप नोंदवण्यत आला आहे         आपल्यासाठी राजकीयदृष