पोस्ट्स

ऑगस्ट २६, २०२० पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

भारतीय रेल्वेचे पाऊल पडते पुढे

इमेज
            विविध 16 उपकंपन्यामार्फत  वेगवेगळ्या  प्रकारची देशसेवा करणाऱ्या,  तसेच विविध अश्या  17 प्रकारच्या रेल्वेगाड्या चालवणाऱ्या आपल्या भारतीय रेल्वेत सध्या अत्यंत जलद गतीने खूप मोठ्या प्रमाणावर बदल होत आहे ज्यामध्ये रेल्वेमार्गातील गेजचे विविध प्रकार नाहीसे करून भारतातील सर्व रेल्वे या ब्रॉडगेज या एकाच स्वरूपात आणणे, सर्व रेल्वेचे विद्युतीकरण करणे . उत्पनाचे विविध मार्ग शोधणे  आदी गोष्टींचा समावेश करावा लागेल याच बदलाच्या मालिकेत गेल्या पंधरवड्यात  देशाच्या प्रगतीला वेगाने चालना देणाऱ्या 2 गोष्टी महाराष्ट्रात तर एक गोष्ट केरळ या राज्यात घडली . माझे लेखन  आजचे या बदलाची माहिती देण्यासाठी              तर मित्रानो,  गेल्या पंधरवड्यात आपल्या महाराष्ट्रातील नाग विदर्भ ( विदर्भातील नागपूर विभागीय आयुक्ता  लयच्या अंतर्गत येणाऱ्या प्रदेशाला नाग विदर्भ म्हणतात . तर अमरावती आयुक्तालयच्या अंतर्गत येणाऱ्या प्रदेशाला वऱ्हाड म्हणतात ) प्रदेशातील गोंदिया -छिनवाडा आणि नागपूर -  जबलपूर या  दोन मार्गाचे नॅरोगेजचे रूपांतरण ब्रॉडगेजमध्ये रूपांतरण करण्यासह या मार्गाचे विद्यतीकरण पूर्ण करण्यात आले आहे