पोस्ट्स

ऑगस्ट १३, २०१८ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

एक राष्ट्र एक निवडणूक निव्वळ अशक्यच

इमेज
सध्या एक राष्ट्र एक निवडणूक या संकल्पनेवर विचारमंथन सुरु आहे . माझ्या मते ही संकल्पना राबवतांना येणाऱ्या खर्चाबाबत फक्त भाष्य केले जाते  जे या प्रश्नाची फक्त एकच बाजू दशर्वते . प्रत्येक प्रश्नाला दोन बाजू असतात , त्यातील दुसऱ्या बाजूचा लेखाजोखा मांडण्यासाठी लेखनप्रपंच आपल्या कडे ईव्हीएम यंत्रामार्फत निवडणूका घेतल्या जातात . सध्या भिन्नभिन्न वेळी निवडणूका घेत असल्याने एकच इव्हीएम यंत्र वारंवार वापरता येते . एकत्रच निवडणूका घेत असल्यास किती ईव्हीएम मशीन  लागतील, आणि एकदा वापरल्यावर परत पाच वर्षांनीच त्याचे काम, येवढी यंत्रे सांभाळयाची ती कशी ? आणि आपल्याकडील एका ईव्हीएम मशीनमध्ये एका वेळी फक्त सोळा नावे अंतर्भुत करता येतात . देशातील पक्षांची आणि अपक्षांची यादी बघता यावर कात्री लावल्याशिवाय एका इव्हिएम वर सर्व नावे येणे अशक्यच, म्हणजे लोकशाहीच्या तत्वावरच घाला घालावा लागणार . म्हणजेच ही संकल्पना कितीही स्त्युत असली तरी राबवतांना अनेक अडचणी येणार . त्यावर तोडगा काढल्याशिवाय ही संकल्पना राबवणे धोक्याचे ठरेल यात शंका नाही

मी आणि माझे वाचन ऑगस्ट १३, २०१८

इमेज
मला आठवतं माझ बालपण चांदोबा, ठकठक, चंपक किशोर आदी मासिकांनी समृध्द केल. काही दिवसापुर्वी मी पेपर स्टाँलला भेट दिली असता जाणवले की काही कार्टुन काँमिक्सचा अपवाद वगळता बहूतेक बालसाहित्य बंद झालंय .रविवारी येणाऱ्या  वृत्तपत्राच्या बालसाहित्याचा पुरवण्यांनी वाचनाची गोडी लावली . आजकाल अपवाद वगळता वृत्तपत्रांनी बालसाहित्याची पुरवणी देणे बंदच केलंय . पुढे माध्यमिक शाळेत असताना शाळेतील ग्रंथपालांनी माहितीपर पुस्तकांची गोडी लावली त्यामुळे माझे ज्ञान समृद्ध होण्यास मदत झाली . मी लहानपणी नाशिक येथील सार्वजनिक वाचानालयाचा बालविभागाचा सक्रिय सभासद होतो.