पोस्ट्स

ऑक्टोबर २७, २०२२ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

जरा त्यांचा मार्ग अनुसरा

इमेज
    सध्या आपल्या भारतात चलनी नोटांवर कोणाचे चित्र असावे, कोणाचे चित्र नसावे, यावरुन मोठ्या प्रमाणात चर्चा सुरु आहे. लोक अत्यंत तावातावाने विविध पर्याय सुचवत आहेत. त्यावरुन तयार केलेली काही व्यंगचित्रे देखील समाजमाध्यमांमध्ये फिरत आहेत. या सर्व गदारोळात मला एक सर्वसामान्य व्यक्ती  म्हणून मला आजपासून 25 वर्षांपासून कवीवर्य कुसुमाग्रजांच्या सुप्रसिद्ध अस्या "स्वातंत्र्यदेवतेची विनवणी" या फटका स्वरुपातील कवीतेची आठवण झाल्याशिवाय रहात नाही. स्वातंत्र्याला 50वर्ष पुर्ण झाल्याबद्दल स्वातंत्र्यदेवता भारतीयांना आता तरी हे दोष सोडा,असी विनंती करत आहोत असी कल्पना करुन एका दैनिकाच्या दिवाळी अंकासाठी ही कविता लिहली होती. त्यात सांगितलेल्या किती बाबीत आपण सुधारलो, किती बाबबत ढासळलो किंवा किती बाबत जैसे थे आहोत,हा मोठा संशोधनाचा विषय ठरावा, असो       या कवितेत त्यांनी  आपण थोर व्यक्तींची आदर्श कसे पायदळी तूडवतो हे स्पष्ट करताना सांगितले  होते की " पथापथावर थोरांचे पुतळे ,ही तर त्यांची विटंबना, जरा तरी त्यांचा मार्ग अनुसरा". आताच्या स्थितीत पुतळ्यांची जागा विविध चित्रांनी घेतलेली आ